Home / महाराष्ट्र / Eknath Shinde : मालवणमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचे वाटप? एकनाथ शिंदेंचा तो विडिओ वायरल

Eknath Shinde : मालवणमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचे वाटप? एकनाथ शिंदेंचा तो विडिओ वायरल

Eknath Shinde : राज्यात सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात मात्र मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सर्वात...

By: Team Navakal
Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde : राज्यात सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात मात्र मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सर्वात जास्त मालवण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. राज्याच्या सत्तेत एकत्रित असलेल्याचा दावा करणारी महायुती या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीमधीलच मित्रपक्षांनी एकमेंकावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजपवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला, तर एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर त्यांनी धाड टाकली होती, या दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी देखील शिवसेना शिंदेंचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावरती मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी शिंदेच्या शिवसेनेवर जाहरिली टीका देखील केली. तसेच त्यांनी मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मालवण दौऱ्यावर आल्यानंतर पैशांच्या बॅगा घेऊन आल्याचा खळबळजनक आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.(Vaibhav Naik)

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यासोबतच त्यांनी या व्हिडीओबाबत काही धक्कादायक खुलासा देखील केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आले असल्याचा गंभीर आरोप, वैभव नाईक यांनी केला आहे.

ते म्हणतात परवा एकनाथ शिंदे मालवणमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सातत्याने शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा दावा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. पुढे ते अस हि म्हणतात हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे. अश्या प्रकारचे आवाहन देखील वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.


हे देखील वाचा – Nagarparishad Election Result : निवडणुकीच्या तोंडावरच हायकोर्टाचा मोठा निर्णय; उद्याची मतमोजणी रद्द

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या