Raigad Shivsena Vs NCP Rada : आज विविध भागात निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामुळे राज्यच्या विविध भागात गर्रमागर्मीच वातावरण आहे. त्यामुळे या वातावरणातून रायगडची सुटका कशी होईल, रायगडमध्ये यावेळी गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये सुशांत जाबरे (Sushant Jabre) आणि त्यांच्या अंगरक्षकाला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले (Vikash Gogawale) यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे (Sushant Jabre) यांच्या समर्थकांच्या बऱ्यचश्या गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे सध्या महाडमध्ये तणावाची परिस्थिती आहे. सध्या महाड पोलिसांकडून हि तानपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (Maharashtra Politics news)
मिळालेल्या माहितीनुसार महाडच्या नवे नगर परिसरात ही हाणामारी झाली. सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज सकाळपासून महाड नगरपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्र देखील बंद पडली होती. त्यामुळे गोगावले आणि जाबरे यांचे समर्थक एका मतदान केंद्रांवर एकत्रित झाले होते. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि त्यानंतर तुफान हाणामारी सुरु झाली.
गोगावेल समर्थकांनी मोठी दगडफेक करुन सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, ही तोडफोड सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची मोठी माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे हा वाद भलताच चिघळला असल्याचे समोर आले आहे. विकास गोगावले तीच रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात गेले असल्याची माहिती आहे त्यामुळे याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे.
हे देखील वाचा –
Maharashtra Election : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी किती?









