Pankaja Munde : राज्यात सध्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची धामधूम आहे, त्याचनिमित्ताने पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात विविध मतदान केंद्रांना भेट दिली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्वतःच्या त्याचसोबत आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय नात्याबद्दल अत्यंत स्पष्ट अशी भूमिका मांडली आहे.
पंकजा मुंडे यांना माध्यमांनी काही प्रश्न विचारले त्यात पत्रकारांनी विचारले की, या निवडणुकीत ‘तुम्हा बहिण-भावाचे पॅनेल’ उतरले आहे, त्याबद्दल अधिक काय सांगाल? यावर त्यांनी अजबच उत्तर दिले. त्यांनी प्रसारमाध्यमांना थेट सूचना केली की, “आम्हाला बहीण-भाऊ बोलणे बंद करा. आम्ही बहीण-भाऊ आहोतच, मात्र, त्याआधी आम्ही गंभीर राजकारणी देखील आहोत. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, आणि मी भारतीय जनता पक्षाची आहे. आम्ही २०-२२ वर्षे राजकारणात झोकून देऊन सातत्याने काम करत आहोत. आपापल्या पक्षाचे नेते म्हणून कार्यरत आहोत.” अशी थेट भूमिका यावेळी पंकजा मुंडे यांनी मंडली.
बीड जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांनी भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. तसेच, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी मोठा प्रचार केला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बीडमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी युती केली होती. याबाबत देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या पक्षांची युती झाली आहे, आम्ही एकच पॅनल केले आहे आणि ही युती सर्व ठिकाणी विजयी होईल”, असा दृढ विश्वास देकील त्यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा –









