Home / क्रीडा / Virat Kohli Vs Gautam Gambhir : विराट – गंभीरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी?

Virat Kohli Vs Gautam Gambhir : विराट – गंभीरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी?

Virat Kohli Vs Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १७ धावांनी घवघवीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना...

By: Team Navakal
Virat Kohli Vs Gautam Gambhir
Social + WhatsApp CTA

Virat Kohli Vs Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १७ धावांनी घवघवीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने ५० षटकांत ८ बाद ३४९ धावांपर्यंत हि कमालीची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जीवतोड प्रयत्न केले. पण अखेर भारताने ह्या सामन्यात घवघवीत यश मिळवलच. त्यानंतर आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेत लपलेले नाही. परंतु याचबरोबर आता पुन्हा एकदा त्यांच्यात वादाची ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. या वृत्तांदरम्यान, चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण पुन्हा एकदा तापले का? याचबरोबर दुसऱ्या वनडे आधी विराट कोहली आणि निवड समिती सदस्य प्रज्ञान ओझा यांच्यात बराच काळ संवाद रंगलेला दिसला. ह्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाय दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळला जाणार आहे.

या सामन्यापूर्वी, विमानतळावर निवड समिती सदस्य प्रज्ञान ओझा याच्याशी कोहलीची दीर्घकालीन चर्चा याचबरोबर आजून एक व्हिडीओ देखील सोशल मीडिआवर वायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये कोहली त्याच्या फोनवर व्यस्त असलयाचे दिसत आहे. एवढंच नव्हे तर मुख्य कोच आणि दिल्लीचा माजी साथी गौतम गंभीर याला विराटने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले केलं. सर्व खेळाडू जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये जात होते, तेव्हाच हे घडल्याचे दिसून येत आहे.

काही मुख्य वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचे कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी असलेले संबंध तणावाचे झाले असल्याच्या चर्चा आहेत. अहवालात असा दावा केला आहे की दोन्ही अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याचे बोलले जात आहे. काही वृत्तांनुसार गौतम गंभीर आणि विराट-रोहित यांच्यातील संबंध तितकेसे चांगले नाहीत. याबाबत किती तथ्यता आहे हे येणाऱ्या काळात समजेलच.


हे देखील वाचा – Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं ‘ते’ वक्तव्य वायरल; धनंजय मुंडेंना आणि मला सतत बहीण-भाऊ’ बोलणं बंद करा..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या