Parliament Adjourned Again – मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) मुद्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
तत्पूर्वी एसआयआरच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदभवनाच्या मकरद्वारवर जोरदार शक्ती प्रदर्शन केले.प्रधानमंत्री सदन ने आओ,अशा घोषणा त्यानी दिल्या.
संसदेचे हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले. अपेक्षेप्रमाणे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासून वादळी ठरत आहे.एसआयआर मागे घेण्याच्या किंवा एसआयआरवर सविस्तर चर्चा घडवून आणण्याच्या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ केला.
त्यामुळे सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करून अखेर सकाळी अकरा वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल विरोधकांना असे सांगितले होते की, सरकार एसआयआरवर चर्चा घेण्याच्या विरोधात नाही.
मात्र सरकारला उत्तर देण्यासाठी थोडा अवधी पाहिजे.विरोधी पक्षांनी मात्र त्यांची विनंती धुडकावून लावली.
मकरद्वारवर इंडिया आघाडीने केलेल्या निदर्शनात काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी , द्रमुक पक्षाचे नेते टी आर बालू आणि इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
हे देखील वाचा –
Virat Kohli Vs Gautam Gambhir : विराट – गंभीरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी?









