IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय (ODI) सामना आज ( 3 डिसेंबर) रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दुपारी 1:30 वाजता सामना सुरू होईल, तर नाणेफेक 1:00 वाजता होणार आहे. दोन्ही संघ मालिकेत निर्णायक पकड घेण्यासाठी या सामन्याकडे नव्या उत्साहाने पाहत आहेत.
भारतासाठी हा सामना या मालिकेत विजय मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला होता. रायपूरची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजीसाठी सोपी मानली जाते, पण खेळ पुढे सरकल्यानंतर फलंदाजांना आव्हान देते.
भारताचे वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचे मिश्रण असलेले गोलंदाजी युनिट (Unit) विशेषतः मधल्या षटकांमध्ये अचूक कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघ शिस्तबद्ध फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्य ठेवून आपली स्थिती मजबूत करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाजांची (कामगिरी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी महत्त्वाची ठरेल, तर वेगवान गोलंदाज भारतावर दबाव आणण्यासाठी सुरुवातीलाच विकेट्स घेण्याचा प्रयत्न करतील.
IND vs SA ODI मालिका: थेट प्रक्षेपण
- टीव्ही: स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स हे घरच्या सामन्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टर आहे.
- ऑनलाईन: चाहते जिओ हॉटस्टार ॲपवर ऑनलाईनसामना पाहू शकतात.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 3 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 1:00 वाजता होईल.









