Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis And Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट ठरली चर्चेचा विषय

Devendra Fadnavis And Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट ठरली चर्चेचा विषय

Devendra Fadnavis And Sanjay Raut : सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरनाचेच...

By: Team Navakal
Devendra Fadnavis And Sanjay Raut
Social + WhatsApp CTA


Devendra Fadnavis And Sanjay Raut : सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरनाचेच वारे वाहत आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच खासदार संजय राऊत यांची रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमा दरम्यान भेट झाली. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे जवळपास २० मिनिटे एकमेकांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कुजबुज पाहायला मिळत आहे.

काल रात्री उशिरा मुंबईतील एका खासगी कार्यक्रमा दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत एकत्र पाहायला मिळाले. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २० मिनिटे संवाद झाला. याचा एक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या फोटोत संजय राऊत हे तोंडाला मास्क लावून बसल्याचे दिसत आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याशी चर्चा करत असल्याचे दिसून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली; याचबरोबर त्यांच्या उपचाराबाबतही माहिती घेतली.

संजय राऊत हे हल्लीच आजारपणातून बरे झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपुलकीने त्यांची भेट घेत प्रकृतीबद्दल विचारणा केल्याचे म्हटलं जात आहे. एकीकडे राजकीय टीका-टिप्पणीमुळे सध्याचे वातावरण गढूळ झाले असताना राज्याच्या दोन प्रमुख नेत्यांच्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.


हे देखील वाचा – Murder Case : सक्षमच्या हत्येआधीच ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; सक्षम ताटेच्या हत्येचा थोडक्यात घटनाक्रम

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या