Anganewadi Jatra 2026 : कोकणात अनेक प्रथा परंपरा मोठ्या उत्सहाने साजऱ्या केल्या जातात. आणि त्यात जत्रा म्हणजे कोकणकरांचा जीव कि प्राण असं म्हणायला हरकत नाही. कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी (Anganewadi Jatra) देवीच्या जत्रेचा मुहूर्त अखेर ठरला. त्यानुसार, नवीन वर्षात ९ फेब्रुवारीला ही जत्रा सुरु होणार आहे. साधारण दीड दिवसांची ही यात्रा असते; आज सकाळी देवीचा कौल घेऊन सदर तारीख निश्चित केली आहे.
आंगणेवाडीच्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा कोणत्याही तिथीनुसार केली जात नाही. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस निश्चित केला जातो. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह लाखो भाविक यात्रेस उपस्थित राहतात. मात्र आता आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठीसुद्धा चढाओढ पाहायला मिळणार आहे. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली केली जाते. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते देखील या जत्रेस उपस्थिती दर्शवतात.
मालवण तालुक्यातील मसुरे या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत ‘भराडी देवी’ विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवलं. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती देखील भराडी देवीची आहे. यावेळी गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीला नवस बोलतात.
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील मोठ्या उत्साहात साजरा होतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक असे देखील म्हणतात.
हे देखील वाचा – High Uranium : दिल्लीच्या भूजलात सापडले युरेनियम; नवीन अहवालाने आरोग्याच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह









