Shital Tejwani : मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी देखील दोन वेळा कसून चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. आणि त्यानंतर अखेर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शितल किसनचंद तेजवाणी विदेशात पलायन केल्याच्या चर्चना उधाण आले होते. मात्र आज पुणे पोलिसांकडून तेजवाणीला अटक केल्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
तेजवाणी यांच्या विरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. दरम्यान, या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी देखील यात सहभागी आहे.
हे देखील वाचा – Winter Session 2025 : यंदा हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरु









