Ambedkar Mahaparinirvan Day – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सोईसुविधांसह,चोख व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे.
चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. चैत्यभूमीतील आदरांजलीचे विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
अनुयायांसाठी निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा व आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
यासाठी ८ हजारांहून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी कर्तव्यतत्पर असणार आहेत. अनुयायांसाठी अन्य ठिकाणी आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देशही पालिकेने दिले आहेत.
गेल्या वर्षी १३ हजार २८२ अनुयायांनी आरोग्य तपासणी व औषधोपचारांचा लाभ घेतला होता. कीटकनाशक व मक्षिका नियंत्रण फवारणीसाठी देखील मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.
चौपाटीवर सुरक्षारक्षकांसहीत बोटी, विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्स,राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष, स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवास अशा अनेक सोईसुविधांसह,चोख पोलीस बंदोबस्त येथे तैनात आहे.
हे देखील वाचा –
तपोवन वृक्षतोडीबाबत अजित पवारयांचा सयाजी शिंदे यांना पाठिंबा
भारत-अमेरिका व्यापार करार अनिश्चित राहिल्याने रुपया ९०.३०/डॉलरच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला









