Borivali Crime : पोलिस दलातीलच एका निवृत्त अधिकाऱ्यानेच एक विकृत कृत्य केल्याचे समोर आले आहे. बोरिवली पूर्व भागात एका ६५ वर्षीय निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने शेजारी राहणाऱ्या ९ वर्षांच्या चिमुरडीवर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
बोरिवली पूर्व परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेत ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पीडित ९ वर्षीय मुलगी आपल्या घरी जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेली. यावेळी त्याच इमारतीत राहणाऱ्या ६५ वर्षीय निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने तिला लिफ्टमध्येच एकटे गाठले. लिफ्टमध्येच या नराधमाने मुलीला ओढत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचारासारखा विकृत प्रकार घडला.हे संपूर्ण दुष्कृत्य लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
घडलेल्या घाणेरड्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी पोहोचताच आपल्या आईला या घटनेची इतंभूत माहिती दिली. आईने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे गाठले आणि यासंदर्भात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली. आणि आरोपी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक देखील केली. त्यानंतर आरोपीला बोरिवली न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देखील सुनावली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुरावे गोळा करण्याचे काम देखील सुरू आहे.
हे देखील वाचा –
Walnuts : महिनाभर दररोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने होतील हे फायदे..









