Super Moon 2025 : आजच्या दिवसाचे एक वेगळेच महत्व आहे. आज पवित्र अशी श्रीदत्तजयंती देखील आहे, तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपर अश्या चंद्राचे दर्शन होणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केलं आहे.
सुपरमून ही एक खगोलीय अशी घटना आहे, जी धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुपरमून बाबत श्री.दा.कृ.सोमण यांनी अधिक माहिती दिली आहे. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि.मीटर अंतरावर असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या ३ लक्ष ५६ हजार ९६२ कि.मीटर अंतरावर येणार असल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे त्या रात्री चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसणार आहे. संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी आपणा सर्वांस या सुंदर अश्या चंद्राचे दर्शन घेता येईल. आज सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी पूर्वेस सुपरमून उगवेल आणि रात्रभर हा चंद्र आपल्या सोबतीस असेल. सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी हा चंद्र पश्चिमेस मावळेल. अशी महती श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगितली आहे.
हे देखील वाचा – Borivali Crime : बोरिवलीत ९ वर्षीय मुलीवर अत्याचार; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने लिफ्टमध्ये केले विकृत कृत्य..









