Haryana Psycho Murderer : हरियाणातील पानिपत आणि सोनीपत येथे चार निष्पाप मुलांच्या झालेल्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. त्या मुलांचा मृत्यू म्हणजे एक छोटासा अपघात होता असच इतकी वर्ष वाटत राहील. पण तो तर एक क्रूर आणि पूर्वनियोजित खून होता हे समोर आल्यावर सगळ्यांचेच डोळे मोठे झाले. एकाच विकृत महिलेने या चार जणांचा जीव घेतला. ती मुलं प्रचंड सुंदर होती, फक्त याच कारणामुळे या विकृत महिलेने निष्पाप मुलांचा बळी घेतला. या हत्याकांड प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह म्हणाले ही महिला सुंदर दिसणाऱ्या मुलींना सातत्याने लक्ष्य करत होती.
या महिलेने याआधी २०२३ मध्ये दोन मुलींना ठार मारलं होतं. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने तिच्या मुलालाही मारून टाकायला पुढे मागे पाहिलं नाही. त्यानंतर आता तिने आणखी एका मुलीला ठार मारलं आहे. आणि या हत्येमुळे ती पकडली गेली आणि चौकशीत तिने याआधी तिच्या तीन मुलांना ठार मारल्याचं देखील कबूल केलं आहे.
ही गोष्ट आहे एका ३२ वर्षीय पूनमची,आणि तिच्या या कृत्यामुळे ती कितपत विकृत असेल याचा अंदाज आता पर्यंत आपल्याला आलाच असेल. पानिपत पोलिसांच्या सांगण्यानुसार, पूनमने चौकशीदरम्यान कबूल केले की तिला सुंदर मुलांचा, विशेषतः मुलींचा खूप द्वेष वाटायचा. धक्कादायक म्हणजे, तिने मारलेल्या चार मुलांपैकी तीन मुली होत्या आणि एक तर तिचा स्वतःचाच पोटचा मुलगा होता.
पोलिसांनी तिची आणखीन कसून चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य समोर आले आहे. तिने या सगळ्या मुलांना पाण्यात बुडवून का मारले यावरही कबुली दिली आहे. पाणयात बुडवून मारणं हा सोप्पं उपाय होता. पाण्यात बुडवल्यावर, मुलं श्वास घेत नाही हे दिसल्यावर ती आता मेलीत हे तिला निश्चित कळायचं, म्हणून ती या मार्गाचा अवलंब करायची.
पहिले दोन खून २०२३ला झाले. पूनमने आधी तिच्या नणंदेच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले आणि मग कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने तिच्या स्वतःच्या मुलाला देखील मारले. त्या दोघांनाही पूनमने घरातल्या पाण्याच्या टँकमध्ये बुडवून मारले. घरात कोणालाही शंका येऊ नये म्हणून नणंदेच्या मुलीसह मी माझ्या मुलालाही मारून टाकले असल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. त्यावेळी घरात खरंच कोणलााही पूनमवर जराही संशय आलेला नाही. तो अपघाती मृत्यू असल्याचं सगळ्यांनी मान्य केलं.
त्यानंतर, ऑगस्ट २०२५ मध्ये, तिने यातला तिसरा खून केला. यावेळी, पूनमचे लक्ष्य ६ वर्षांची चिमुकली जिया होती. ऑगस्ट २०२५ मध्ये, पूनम ही सिवाह गावात तिच्या माहेरी गेली होती. तिथे तिने तिच्या चुलत भावाची ६ वर्षांची चिमुकली मुलगी जिया हिला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले.आणि यात जियाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू देखील अपघात मानून कुटुंबियांनी या लहानगीचे अंत्यसंस्कार केले.
त्यानतंर १ डिसेंबरला पूनमने अशीच एक चौथी हत्या केली,१ डिसेंबर रोजी नौलठा गावात तिच्या नातेवाईकांचं लग्न होतं. सर्वजण लग्नाच्या वरातीत व्यस्त होते. तेवढ्यात पूनमची नजर एका ६ वर्षांच्या लहान विधीवर पडली. आणि तिने या लहान विधीचा देखील पाण्यात बुडवून खून केला.
या लहान मुलीच्या घरत लग्नाचे विधि सुरू होते. शगुन देण्यासाठी आजीने विधीला बोलावलं, पण बऱ्याच हाका मारूनही विधि काही सापडेना. संपूर्ण कुटुंब घाबरले आणि त्यांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. बराच शोध घेतल्यानंतर, विधीचा मृतदेह लग्नघराच्या पहिल्या मजल्यावर एका बंद स्टोअररूममध्ये त्यांना आढळला. तिचे डोके पाण्याच्या टबमध्ये बुडवले होते. त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
त्यानंतर पोलिसांनी सर्वांची चौकशी करायला सुरवात केली. तेव्हाही पूनमने न घाबरता, अगदी आत्मविश्वासाने सगळयांची सराईतपणे खोटी उत्तरं दिली. पोलिसी खाक्या दाखवत कठोरपणे चौकशी केल्यावर पूनमने अखेर सत्य काबुल केलं. आणि मग उघडलं या खुणा मागच रहस्य.
हे देखील वाचा – Super Moon 2025 : आज होणार तेजस्वी अश्या देखण्या चंद्राचे दर्शन? पंचांग काय सांगते..
(ह्या अश्या घटना प्रचंड गंभीर स्वरूपाच्या आहेत. एखादी आई स्वतःच्या पोटच्या लेकराची अशी अमानुषपणे हत्या करते. शिवाय इतर ३ मुलांची हत्या करते हि घटना विकृती सोबतच मानसिक दुबळेपणा देखील प्रकर्षाने दाखवते. बरयाचदा मानसिक आजार म्हणजे समाज वेडा ठरवून मोकळा होतो. पण हे एवढ्या पुरतच मर्यादित आहे का? जर या महिलेच्या कुटुंबीयांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तिच्यावर वेळीच उपचार केले असते तर आज हे इतके बळी गेले नसते. बऱ्याचदा मानसिक आजाराला आपल्या समाजात हलक्यात घेतले जाते. ह्या आजाराला हलक्यात न घेता यावर वेळीच उपचार करण अत्यंत महत्वाचे आहे. या महिलेने केलेल्या कृत्याच समर्थन करण्याचा नवाकाळचा हेतू नाही. समाजात मानसिक आजार असलेली निर्थक मते बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे)









