Digvijay Singh Meets Uddhav Thackeray : काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी आज मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेने बरोबर मनसेला घ्यायचे की नाही या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाली.
या बाबतचा निर्णय काँग्रेसकचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खड्गे घेणार असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगतले. येत्या १४ डिसेंबर रोजीं उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन खडगे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर यावर तोडगा काढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे;
आज काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे दुपारी मुंबईत आगनाम झाले. त्यांनी मातोश्रीवर सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली. पालिका निवडणुकीत मनसेला आपल्याबरोबर घ्यायचे की नाही यावर तोडगा काढण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.
त्यावेळी सिंग यांनी सांगितले की तुम्ही काँग्रेस पक्षाध्यक्ष खड्गे यांच्याशी वन टू वन चर्चा करायला हवी.त्यामुळे यासाठी १४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे दिल्ली येथे जाणार आहेत, खडगे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर याबाबतची स्पष्टता होईल असे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसने नुकतीच मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पक्षांतर्गत दोन भिन्न मतप्रवाह समोर आले आहेत.त्यानंतर मनसेला बरोबर घेण्यासही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती.
हे देखील वाचा – Toxic Gas Leak : झारखंडमध्ये ‘विषारी वायू गळती’मुळे २ जणांचा मृत्यू, काही जण रुग्णालयात









