PM Modi Gifts Bhagavad Gita To Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन भाषेत अनुवादित केलेली भगवतगीतेची प्रत भेट दिली आहे.
जगातील कोट्यवधी लोकांसाठी भगवतगीतेची शिकवण प्रेरणास्रोत आहे, असे पंतप्रधानांनी ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडियावर फोटोसह पोस्टमध्ये नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या पालम विमानतळावर पुतिन यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करताना आनंद झाला. आज संध्याकाळच्या आणि उद्याच्या आमच्या चर्चांकडे लक्ष लागून आहे. भारत-रशियाची मैत्री ही काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली आहे आणि त्याचा दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठा फायदा झाला आहे,” असे मोदींनी म्हटले.
Presented a copy of the Gita in Russian to President Putin. The teachings of the Gita give inspiration to millions across the world.@KremlinRussia_E pic.twitter.com/D2zczJXkU2
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2025
दोन्ही नेत्यांनी विमानतळावरून पंतप्रधानांच्या लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानापर्यंत एकाच गाडीतून प्रवास केला, ज्यामुळे त्यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणि जवळचे संबंध अधोरेखित झाले. पुतिन यांचा हा 4 वर्षांतील पहिला भारत दौरा आहे.
भारत-रशिया भागीदारीचे ऐतिहासिक महत्त्व
पुतिन यांच्या या दौऱ्याला तज्ज्ञांनी मोठे महत्त्व दिले आहे. संरक्षण, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक आणि मानवतावादी व्यवहार या क्षेत्रांमधील सहकार्याला या दौऱ्यामुळे मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
पुतिन 5 डिसेंबरपर्यंत नवी दिल्लीत असतील आणि पंतप्रधान मोदींसोबत 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. पुतिन यांच्या या भेटीदरम्यान विविध व्यापारी करारांवर स्वाक्षऱ्या होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हे देखील वाचा – Digital 7/12 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता, ₹15 मध्ये उतारा मिळणार









