Home / क्रीडा / IND vs SA 3rd ODI :  भारत-दक्षिण आफ्रिकेतील तिसरा वन-डे सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

IND vs SA 3rd ODI :  भारत-दक्षिण आफ्रिकेतील तिसरा वन-डे सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 वन-डे सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीच्या स्थितीत...

By: Team Navakal
IND vs SA 3rd ODI
Social + WhatsApp CTA

IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 वन-डे सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीच्या स्थितीत आहे. पहिल्या वन-डे मध्ये भारतीय संघाने 17 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकी संघाने 4 विकेट्सनी विजय मिळवून मालिकेत जोरदार पुनरागमन केले.

आता या मालिकेचा अंतिम फैसला 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डे सामन्यात होणार आहे. ही मालिका 2-1 ने जिंकण्याची संधी दोन्ही संघांना आहे.

दुसऱ्या सामन्यातील शतके

दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने विराट कोहली (102 धावा) आणि ऋतुराज गायकवाड (105 धावा) यांच्या शानदार शतकांच्या मदतीने 358 धावांचा मोठा स्कोर उभा केला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या एडन माक्ररम (110 धावा) याच्या दमदार शतकी खेळीमुळे आफ्रिकी संघाने हा मोठा टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केला. मात्र मालिका पणाला लागल्यामुळे, दोन्ही संघांमध्ये चुरशीची आणि अत्यंत रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे.

सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वन-डे मुकाबला विशाखापट्टणमच्या वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. टॉस (नाणेफेक) सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे दुपारी 1:00 वाजता होईल.

लाईव्ह प्रसारण आणि मोफत स्ट्रीमिंग क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे या तिसऱ्या वन-डे सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याव्यतिरिक्त, चाहते Jio Hotstar ॲपवर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही, फक्त मोबाईल फोनमध्ये Jio Hotstar ॲप डाउनलोड (डाऊनलोड) करण्याची आवश्यकता आहे.

दोन्ही संघांचे स्क्वॉड

भारतीय संघ: यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, तिलक वर्मा.

दक्षिण आफ्रिका: एडन माक्ररम, रायन रिकेल्टन, टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मॅथ्यू ब्रीट्झके, टोनी डी जोरजी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जानसन, कॉर्बिन बॉश, प्रेनेलन सुब्रायन, नंद्रे बर्गर, ओटनील बार्टमन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रुबिन हरमन.

हे देखील वाचा – Digital 7/12 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता, ₹15 मध्ये उतारा मिळणार

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या