Vladimir Putin in India : रशियाचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीची आज जागतिक पातळीवर चर्चा होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात आले. शिवाय त्यांनी आज राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली.
एकाबाजूला रशिया आणि युक्रेन यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात रशिया हा देश एकटा पडला होता. आणि दुसरीकडे मात्र अमेरिकेच्या जाचक टेरिफ धोरणामुळे भारतावरही अनेक आर्थिक संकटे ओढवली असताना या दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा हि महत्वपूर्ण ठरली.
कोणत्याही बलाढ्य राष्ट्राचे प्रमुख आपल्या देशामध्ये भेटीस आल्यानंतर त्याची हवा नाही झाली तर मग काय अर्थ. त्यांच्या कार्याची, खासगी आयुष्याची, मालमत्तेची, राहणीमानाची प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा होणे हे तर स्वाभाविकच होते. कोणीही राष्ट्राध्यक्ष अथवा त्या त्या देशांचे पंतप्रधान भारत भेटीवर आल्यास आपल्या देशासोबत त्यांचे विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीचे करार होतात, उद्योगधंद्याची, तसेच शस्त्रांची देवाणघेवाण होते. यापूर्वी रशियाच्या अनेक नेत्यांनी जरी भारताचे दौरे केले असले तरी देखील पुतीन हे आजतागायतचे सर्वात बलाढ्य नेते समजले जातात.
खर तर फार आधीपासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच रशिया आणि भारत हे नैसर्गिक मित्र असल्याचे बोलले वाजते. भारतात स्वातंत्र्यानंतर नियोजनाच्या माध्यमातून जे पंचवार्षिक योजनांचे पर्व सुरू झाले त्यामागील प्रेरणासुद्धा रशियातील पंचवार्षिक योजना असल्याचे बोलले जाते. रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू असतानासुद्धा भारत आणि रशिया यांच्यात खंड पडलेला नाही.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष सुरू असतानाच जगातील सर्वच देशांनी रशियावर बहिष्कार टाकायची भाषा केली असूनसुद्धा भारताने रशियाकडून कच्या तेलाची आयात करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली होती. आणि इथून भारत देश सगळ्याच्या नजरेत बसला. या कारणामुळेच तर भारतावर जाचक टेरिफ लादले गेले.
भारत वगळता बहुतेक सगळ्याच देशांनी रशियाबरोबर आपले व्यापारी संबंध काही प्रमाणात कमी केले आहेत. मात्र भारताने यामध्ये कोणत्याही प्रकारची घट केलेली नाही. मात्र काही देशांना हे पटलेले नाही. मात्र या सगळ्याने भारताला काहीच फरक पडलेला नाही. भारताच्या हिताच्या दृष्टीने पुतीन यांचा हा दौरा भारताला किती फायदेशीर ठरला आहे हे येणाऱ्या काळात कळेलच.
हे देखील वाचा – Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था कोलमडते आहे का? रुपया गेला रसातळाला









