Home / देश-विदेश / Indigo Flight Crisis : ऐनवेळी इंडिगोचे विमान झालं रद्द; नवविवाहित जोडप्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली व्हिडिओ कॉलवर हजेरी..

Indigo Flight Crisis : ऐनवेळी इंडिगोचे विमान झालं रद्द; नवविवाहित जोडप्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली व्हिडिओ कॉलवर हजेरी..

Indigo Flight Crisis : कर्नाटकात एक अजब गोष्ट घडली आहे. कर्नाटकच्या हुबळी शहरात एका लग्न समारंभात नवरी – नवरदेव वेळेवर...

By: Team Navakal
Indigo Flight Crisis
Social + WhatsApp CTA

Indigo Flight Crisis : कर्नाटकात एक अजब गोष्ट घडली आहे. कर्नाटकच्या हुबळी शहरात एका लग्न समारंभात नवरी – नवरदेव वेळेवर पोहोचू शकले नाहीत. आणि त्यांच्या जागी त्यांच्या आई-वडिलांनाच या रिसेप्शनच्या खुर्चीवर बसावे लागले. याचे मुख्य कारण ठरले इंडिगो एअरलाइन्सची अचानक रद्द झालेली उड्डाणे.

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या संकटामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागला आहे. त्यामुळे लोक कुठूनही येऊ शकत नाहीत आणि कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीत. कारण इंडिगोच्या विमान कंपन्या मोठ्या प्रमाणावर रद्द केल्या जात आहेत. दरम्यान, लोक त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी देखील इतर शहरांमध्ये पोहोचू शकत नाहीत. यामुळेच एका जोडप्याला त्यांच्याच लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहावे लागले.

हे जोडपं बंगळूरुमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर येथे पार पडले. त्यानंतर नवविवाहित जोडप्यासाठी हुबळी येथे एका मोठ्या रिसेप्शन आयोजित केले होते. हुबळीतील गुजरात भवनमध्ये या रिसेप्शन सोहळ्यासाठी या जोडप्याच्या कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती आणि सर्व लोकांना निमंत्रित केले होते.

या रिसेप्शनसाठी जोडप्याने २ डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून बंगळूरु आणि तिथून हुबळीसाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. पण, २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विमानांना उशीर होण्यास सुरुवात झाली होती. ३ डिसेंबर रोजी पहाटे ४-५ वाजेपर्यंत विमान उशीराने उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात आले. शेवटी, ३ डिसेंबरच्या सकाळी अचानक त्यांचे विमान रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली.

विमान रद्द झाल्यामुळे हे जोडपं वेळेवर हुबळीला पोहोचू शकले नाही. पण इकडे गुजरात भवनमध्ये सर्व पाहुणे मात्र जमले होते आणि तयारी देखील पूर्ण झाली होती. यावर तोडगा म्हणून तातडीने प्रोजेक्टर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. नवविवाहित जोडपे भुवनेश्वर येथूनच स्वतःच्याच रिसेप्शनला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित झाले.

इंडिगोच्या विमानांच्या खोळंब्यामुळे एका जोडप्याला आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण अशा प्रकारे साजरा करावा लागला, अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे. दिल्ली विमानतळावर तर शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत इंडिगो विमाने रद्द केली असल्याची माहिती एअरपोर्ट ऑपरेटरने दिली आहे.


हे देखील वाचा – Rahul Vaidya : गोवा- मुंबई विमान प्रवास पडला ४ लाखांना; गायकाने सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या