Home / महाराष्ट्र / Mumbai News : वरळीत भाजप – ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने; वरळीत तुफान राडा

Mumbai News : वरळीत भाजप – ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने; वरळीत तुफान राडा

Mumbai News : मुंबईत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाला आहे. कामगार युनियनवरून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात...

By: Team Navakal
Mumbai News
Social + WhatsApp CTA

Mumbai News : मुंबईत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाला आहे. कामगार युनियनवरून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. वरळी परिसरातील हॉटेल सेंट रेजिस मध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. मागच्या अनेक वर्षांपासून या हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाची यूनियन कार्यरत आहे. मात्र भाजपकडून याच हॉटेलमध्ये पुन्हा भाजपची युनियन बनवण्याचा प्रयत्न केला गेला. याला विरोध करताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हॉटेलच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेलबाहेर घोषणाबाजी देखील केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी सुरवातीला मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे कामगार फोडण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील कामगारांचा यात समावेश आहे. याअगोदर बांद्रयातील ताज लँड हॉटेलमध्ये वाद झाला होता. आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही या ठिकणी आलो होतो जेणेकरून कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हालाही आवाज उठवता येईल,परंतु; ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी उगीचच गोंधळ घालायला सुरवात केली. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही, असे एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. बांद्रा येथे भाजपने आपला फलक आणि झेंडा लावला, मात्र वरळीत ठाकरेंच्या सेनेने विरोध करत भाजपने लावलेला बोर्ड फाडून फेकून दिला.

मागच्या अनेक वर्षांपासून आमची युनियन या हॉटेलमध्ये कार्यरत आहे, मात्र भाजप सत्तेचा वापर करत दुसरी यूनियन स्थापन करण्याचा कपटी प्रयत्न करत आहे. हॉटेलमधील कर्मचारी हे भाजपकडे येतात असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोणतेही कामगारांचे नियम न पाळता भाजप सत्तेचा वापर करत आहे असा आरोप देखील ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. अनियमितपणे किंवा अनधिकृतपणे युनियन स्थापन केली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे.

राडा करणाऱ्यांवर होणार कारवाई – फडणवीस
राडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा पूर्ण हक्क आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हे देखील वाचा – Indigo Airline : पुणे ते मुंबई विमान प्रवास तब्ब्ल ६१ हजार रुपयांचा; विमान प्रवासाचे दर वाढले

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या