Home / महाराष्ट्र / Sheetal Tejwani : शीतल तेजवाणीच्या घरी पुणे पोलिसांची झाडाझडती, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता

Sheetal Tejwani : शीतल तेजवाणीच्या घरी पुणे पोलिसांची झाडाझडती, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता

Sheetal Tejwani : शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पुणे पोलिसांनी हजेरी लावली आहे. पोलिसांकडून इथे झाडाझडती सुरु असल्याची माहिती समोर...

By: Team Navakal
Sheetal Tejwani
Social + WhatsApp CTA

Sheetal Tejwani : शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पुणे पोलिसांनी हजेरी लावली आहे. पोलिसांकडून इथे झाडाझडती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या शीतलकडून महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात येणार आहे. मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच ३०० कोटींपैकी काही रक्कम देखील हस्तगत करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलीस शीतल तेजवानीच्या पिंपरीच्या घरी आले आहेत.

शीतल तेजवाणी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास होते. मात्र तिचं माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिरालगत आहे. शितलने याचं माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका देखील पुणे पोलिसांना आहे.

मुंढव्यातील ४० एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांकडून अटक अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची याआधी २ वेळा चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे देखील स्पष्ट झाल्यावर अखेर तिचाय्वर अटकेची कारवाई करण्यात आली.

पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने याआधी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी देखील झाली होती. मीडिया रिपोर्ट्समुळं आपणास लक्ष्य केलं जात असल्याचा दावा देखील तेजवानीने याचिकेत केला होता. एफआयआर मीडिया रिपोर्टवर गुन्हा दाखल केला असून मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा आरोप याचिकेत केला होता. मुंढवा जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु या़ंच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी देखील यात उडी घेत नऊ जणांविरोधात थेट गुन्हा दाखल केला होता‌.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या