Home / देश-विदेश / Amitabh Bachchan :अमिताभ बच्चन यांचे नाव झाशीच्या मतदार यादीत

Amitabh Bachchan :अमिताभ बच्चन यांचे नाव झाशीच्या मतदार यादीत

Amitabh Bachchan : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरनिरीक्षणादरम्यान (SIR) एक आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.गेली कित्येक वर्षे मुंबईत वास्तव्यास असलेले...

By: Team Navakal
Amitabh Bachchan
Social + WhatsApp CTA

Amitabh Bachchan : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरनिरीक्षणादरम्यान (SIR) एक आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.गेली कित्येक वर्षे मुंबईत वास्तव्यास असलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांचे नाव उत्तर प्रदेशमधील झाशी या ऐतिहासिक शहरातील मतदार यादीमध्ये आढळून आले आहे.

अमिताभ यांच्यासोबत त्यांचे दिवंगत वडील सुप्रसिध्द कवी हरिवंशराय बच्चन यांचेदेखील नाव मतदार यादीत आहे.झाशीतील ओरछा गेटच्या बाहेर असलेल्या काचियाना परिसरात घर क्र.५४ मध्ये बच्चन पिता-पुत्राचे नाव आहे.यादीत बच्चन यांचे वय ७६ वर्षे दाखवण्यात आले आहे आणि वरताण म्हणजे या ठिकाणी अमिताभ बच्चन यांनी २००३ साली मतदानही केले असे या अधिकृत कागदपत्रात नोंद आहे.यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी परिसरात चौकशी केली असता आम्ही अमिताभ बच्चन यांना फक्त पडद्यावर पाहिले आहे.ते आमच्या शेजारी राहतात किंवा कधी काळी रहात होते याची आम्हाला कल्पना नाही.आम्ही त्यांना कधीच येथे पाहिले नाही.

Web Title:
संबंधित बातम्या