Home / महाराष्ट्र / Omkar elephant: ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये हलवणार ?

Omkar elephant: ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये हलवणार ?

Omkar elephant – महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमाभागात गेले सुमारे चार महिने धुमाकूळ घालत असलेल्या ओंकार (Omkar elephant) या जंगली हत्तीला...

By: Team Navakal
Omkar elephant
Social + WhatsApp CTA

Omkar elephant – महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमाभागात गेले सुमारे चार महिने धुमाकूळ घालत असलेल्या ओंकार (Omkar elephant) या जंगली हत्तीला पकडून उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या गुजरातमधील वनतारा (Vantara) वन्य प्राणी पुनर्वसन केंद्रात हलविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गोव्याच्या वनखात्याची यासंदर्भात महाराष्ट्राच्या वनखात्याशी चर्चा सुरू आहे.

दहा वर्षे वय असलेला ओंकार हत्ती सुमारे तीन महिने महाराष्ट्रातील सीमेलगतच्या गावांत धुमाकूळ घातल्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी पुन्हा गोव्यात दाखल झाला आहे.पेडणे येथील फकीरपाडो येथे तो पहिल्यांदा दृष्टीस पडला.दुसऱ्या दिवशी तो तोरसेमध्ये आढळून आला.तोरसेमध्ये त्याने शेती आणि बागायतींची मोठी नासधूस केली. सध्या त्याचा संचार मोपा-उगवे-निगाल्ये-पोरास्काडा पट्ट्यात आहे.येथे त्यांनी केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान केले आहे. काही वाहनांचीदेखील त्याने तोडफोड केली आहे.

वन विभागाने ओंकारला पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.ड्रोन पथकांच्या साह्याने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.महाराष्ट्राच्या वन विभागाने ओंकारला पकडण्याची पूर्ण तयारी केली असून त्याला पकडून वनतारामध्ये हलवण्यासाठी णुंबई उच्च न्यायालयाची परवानगीही मिळवली आहे.त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र वनविभाग संयुक्तपणे मोहीम हाती घेऊन ओंकारला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या