Home / देश-विदेश / Hiren Joshi: पंतप्रधानांचे विश्वासू सचिव हिरेन जोशींची हकालपट्टी! काॅंग्रेसचा दावा

Hiren Joshi: पंतप्रधानांचे विश्वासू सचिव हिरेन जोशींची हकालपट्टी! काॅंग्रेसचा दावा

Hiren Joshi: लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाच पंतप्रधान कार्यालयात मोठ्या हालचाली झाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेस(Congress) नेते आणि...

By: Team Navakal
MODI
Social + WhatsApp CTA

Hiren Joshi: लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाच पंतप्रधान कार्यालयात मोठ्या हालचाली झाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेस(Congress) नेते आणि प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ सचिव आणि पंतप्रधान मोदींचे विश्वासू समजले जाणारे अधिकारी हिरेन जोशी (Hiren Joshi) यांची अचानक हकालपट्टी करण्यात आली आहे.

पवन खेरा म्हणाले की, हिरेन जोशी हे पंतप्रधान कार्यालयामध्ये बसून काही व्यावसायिक व्यवहार हाताळत होते. त्यांचा बेटिंग अॅपमध्ये सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. परदेशात त्यांच्या बिझनेसच्या लिंक आहेत का याचा तपास झाला पाहिजे.

हिरेन जोशी हे पंतप्रधान कार्यालयातील संपर्क आणि तंत्रज्ञान विभागाचे विशेष सचिव होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डोळे आणि कान म्हणून दिल्लीच्या सत्ताकेंद्रात त्यांची ओळख होती. मागील १८ वर्षांपासून ते मोदी यांच्यासोबत काम करत होते. त्यामुळे खेरा यांनी केलेले दावा गंभीर मानला जात आहेत. मात्र सरकारकडून किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.


हे देखील वाचा – 

विरार इमारत दुर्घटना प्रकरण सहाय्यक आयुक्त घोन्साल्विसना अटक

नागपुरात हिवाळी अधिवेशनात ३३ हून अधिक मोर्चे धडकणार ; पोलीस सुरक्षा कडक

ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये हलवणार ?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या