Home / arthmitra / Avadhut Sathe : प्रसिद्ध फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठेंना शेअर बाजारात ‘नो एंट्री’, 546.16 कोटींची कमाई जप्त; कारण काय?

Avadhut Sathe : प्रसिद्ध फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठेंना शेअर बाजारात ‘नो एंट्री’, 546.16 कोटींची कमाई जप्त; कारण काय?

SEBI Action Avadhut Sathe : स्टॉक मार्केटचे नियमन करणारी संस्था सेबीने (SEBI) प्रसिद्ध फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठे, त्यांच्या पत्नी गौरवी साठे...

By: Team Navakal
SEBI Action Avadhut Sathe
Social + WhatsApp CTA

SEBI Action Avadhut Sathe : स्टॉक मार्केटचे नियमन करणारी संस्था सेबीने (SEBI) प्रसिद्ध फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठे, त्यांच्या पत्नी गौरवी साठे आणि अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी (ASTAPL) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

सेबीने साठे यांच्या कथित 546.16 कोटी रुपयांच्या अवैध कमाईवर जप्ती आणण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने आपल्या अंतरिम आदेशात ही रक्कम 15 दिवसांच्या आत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जमा करावी, असे स्पष्ट केले आहे.

फसव्या जाहिरातींमुळे कारवाई

साठे यांच्या अकादमीने असे व्हिडिओ आणि जाहिराती प्रसारित केल्या होत्या, ज्यात दावा करण्यात आला होता की, त्यांच्या कोर्समुळे विद्यार्थ्यांना प्रचंड नफा झाला आहे. मात्र, सेबीच्या तपासणीत या दाव्यांच्या अगदी उलट माहिती समोर आली. तपासणीनुसार, 186 विद्यार्थ्यांपैकी 121 विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांत नुकसान झाले होते.

प्रशासकीय इशारा देऊनही ASTAPL कडून दिशाभूल करणारे दावे पसरवले जात असल्याचे सेबीच्या लक्षात आले. तपासणीत हे देखील उघड झाले की, व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर संदर्भात शिफारसीआणि थेट मार्केट डेटाचा वापर खुद्द अवधूत साठेच करत होते.

बाजारपेठेत प्रवेशावर बंदी

कंपनीकडून केले जाणारे मार्गदर्शन हे वास्तविक पाहता नियमांनुसार नोंदणीकृत नसलेले गुंतवणूक सल्लागार होते. हा नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सेबीने स्पष्ट केले. याच आधारावर सेबीने अवधूत साठे, त्यांची पत्नी आणि ASTAPL या तिघांनाही सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यावर, खरेदी-विक्रीकरण्यावर किंवा कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्यावर तात्काळ बंदी घातली आहे.

यासोबतच, त्यांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्टॉक विश्लेषण, थेट ट्रेडिंग, स्टॉक-संबंधित मार्गदर्शन किंवा नफ्याचे दावे प्रकाशित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फंड गोठवले आणि पुढील कार्यवाही

सेबीने आदेशात म्हटले आहे की, साठे हे कोणत्याही प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे वळवू शकत नाहीत किंवा खर्च करू शकत नाहीत. सर्व संशयास्पद रक्कम एस्क्रो खात्यात ठेवावी लागेल. भविष्यात त्यांना शैक्षणिक उपक्रम करायचे असल्यास, त्यांना सिक्युरिटीज कायद्यांचे पूर्णपणे पालन करावे लागेल, असेही सेबीने स्पष्ट केले.

अवधूत साठे यांची बाजारात मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यांचे यूट्यूबवर 9.3 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. या मोठ्या निर्बंधानंतर त्यांच्या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांना सेबीच्या ‘कारण दाखवा नोटीस’चे उत्तर देण्यासाठी 21 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. आरोपांवर योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास त्यांच्याविरोधात अंतिम आदेश जारी केला जाईल.

हे देखील वाचा – कॉमनवेल्थनंतर अहमदाबादमध्ये लवकरच ऑलिम्पिक! गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दावा; 2036 च्या तयारीला लागा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या