Home / देश-विदेश / Babri Masjid :पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा अंगार ! बाबरी मशीद बांधणार! हजारो विटा आणल्या

Babri Masjid :पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा अंगार ! बाबरी मशीद बांधणार! हजारो विटा आणल्या

Babri Masjid- पश्चिम बंगालमध्ये 2026 साली विधानसभा निवडणुका आहेत. यामुळेच इथे राजकारण तापू लागले आहे. आज तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार...

By: Team Navakal
BABARI
Social + WhatsApp CTA
Babri Masjid- पश्चिम बंगालमध्ये 2026 साली विधानसभा निवडणुका आहेत. यामुळेच इथे राजकारण तापू लागले आहे. आज तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबादच्या बेलडांगा भागात बाबरी मशीद बांधण्याचा निर्धार करीत मशिदीची पायाभरणी केली. यासाठी हजारो मुस्लीम बांधव डोक्यावर, गाड्यांतून बांधकामासाठी विटा घेऊन आले होते. हा अंगार भडकावा यासाठी पोलीस केवळ हा कार्यक्रम पाहत राहिले. कालच कोर्टानेही बाबरी मशीद ( Babri Masjid) बांधायला परवानगी दिली होती. त्यामुळे अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला 33 वर्षे झाली असतानाच पश्चिम बंगालमध्ये बाबरीच्या उभारणीचा अंगार भडकू लागला आहे.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस आणि भाजपासह सर्व पक्षांचा विरोध झुगारून आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे अयोध्येतील बाबरी मशिदीसारख्याच  बाबरी मशिदीची पायाभरणी समारंभ यशस्वी करून दाखवला. काल कोलकाता उच्च न्यायालयाने या शिलान्यास समारंभाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे कबीर यांच्या मार्गातील कायदेशीर अडथळा आधीच दूर झाला होता. मात्र या बाबरी शिलान्यास कार्यक्रमामुळे राज्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. हुमायून यांनी शिलान्यास केला आणि ते मुर्शिदाबादच्या मुस्लिमांचे नवे हिरो बनले आहेत. ममता बॅनर्जी यांनी हुमायून यांना तृणमूल पक्षातून निलंबित केल्यामुळे त्यांच्याबाबत संताप व्यक्त करीत ममता बॅनर्जी यांना यावेळी मतदान करणार नाही असे प्रत्येक तरुण सांगत होता.


आज अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवशी आपण मुर्शिदाबादमध्ये अयोध्येतील बाबरी मशिदीसारखीच मशीद बांधू, अशी घोषणा हुमायून कबीर यांनी केल्यापासून राज्याच्या राजकारणात धार्मिक ध्रुवीकरणाचे वारे वाहू लागले होते. कबीर यांच्या या घोषणेमुळे तृणमूल काँग्रेस वारंवार अडचणीत येत होती. तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कबीर यांना विरोध केला. पण कबीर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर गुरुवार 4 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी यांच्या मुर्शिदाबादमधील  सभेच्या आधी कबीर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. तरीही कबीर मागे हटले नाहीत. सर्व विरोध डावलून त्यांनी आज पायाभरणी कार्यक्रम पुढे रेटला.


हा समारंभ भव्य दिव्य व्हावा, असे नियोजन हुमायून कबीर यांनी केले होते. सुमारे तीन लाख मुस्लीम बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहतील या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले होते. राज्यातील एकमात्र उत्तर-दक्षिण मुख्य राज्यमार्ग असलेल्या एनएच-12 राष्ट्रीय महामार्गालगत मोरादघी येथे एका शेतजमिनीवर विशाल शामियाना उभारण्यात आला होता. या शामियान्यात 150 फूट लांब आणि 80 फूट रुंद असा विशाल मंच उभारण्यात आला होता. या मंचावर एकावेळी 400 पाहुण्यांची आसन व्यवस्था होती. कार्यक्रमासाठी येणार्‍यांसाठी बिर्याणीची 40 हजार पाकिटे तर स्थानिकांसाठी 20 हजार पाकिटे तयार ठेवण्यात आली होती. या आयोजनावर सुमारे 60 ते 70 लाख रुपये खर्च करण्यात आला. शिलान्यास करताना धार्मिक विधी करण्यासाठी सौदी अरेबियामधून काझी बोलावण्यात आले होते. या काझींना मिरवणुकीतून वाजत गाजत शिलान्यासच्या ठिकाणीआणण्यात आले. राष्ट्रीय महामार्गापासून पायाभरणीच्या ठिकाणी येणार्‍या सर्व मार्गांवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांसह हुमायून यांचे तीन हजार स्वयंसेवक गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते.


आज सकाळपासूनच राज्यातील कानाकोपर्‍यातून मुस्लीम बांधव डोक्यावर मातीच्या विटा घेऊन मुर्शिदाबादकडे येताना दिसत होते. काही जण दुचाकीवरून गळ्यात विटा लटकवून आले होते. ‘नारा-ए- तकबीर, अल्ला हू अकबर’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हे सर्व लोक हुमायून कबीर यांचा जयजयकार करत ममता बॅनर्जी यांचा धिक्कार करत होते. हुमायून कबीर वाघ आहेत, ते  कुणाच्याही समोर झुकणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी त्यांना पक्षातून निलंबित करून तमाम मुस्लिमांचा अपमान केला आहे. आम्ही येणार्‍या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना धडा शिकवू. त्यांनी कबीर यांना निलंबित करून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला, असे काही लोक माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगत होते.


या पायाभरणी कार्यक्रमावरून भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हुमायून कबीर यांच्यावर सडकून टीका केली.
बाबरी मशीद हा विषय कधीच संपला आहे. तो पुन्हा उकरून काढू पाहणारे हुमायून कबीर मूर्ख आहेत. मशिदीच्या आड ते गलिच्छ राजकारण करत आहेत. या देशात कित्येक वर्षे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशाच प्रकारे दोन धर्मात तेढ निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधत आले आहेत.तोच प्रकार आता कबीर करू पाहत आहेत, अशी टीका काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी केली. तर भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, बाबरचा बाप जरी आला तरी बाबरी पुन्हा होणार नाही.


अदिना मशीद मूळचे आदिनाथ मंदिर?
बेलडांगा येथे बाबरी मशीद बांधण्यावरून वातावरण तापले असताना पश्चिम बंगालचे भाजपा उपाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी राज्यसभेत मागणी केली की मालदा जिल्ह्यातील अदिना मशीद हे मूळचे आदिनाथ मंदिर आहे. या मशिदीवर कमळ, गणेशमूर्ती, लक्ष्मीचे हात आदि कोरीव काम आहे. याचा अर्थ हे मुळात मंदिर होते.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

शिवसेना- राष्ट्रवादी भाजपाच्या ताटाखालचे मांजर!वडेट्टीवारांची टीका

 स्वराज्य संस्था निवडणूक याचिकांची ९ डिसेंबरला एकत्रित सुनावणी होणार

सरकारच्या हातातील कठपुतळी बनू नका; खा. प्रियंका चतुर्वेदींचा राष्ट्रपतींना सल्ला

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या