Tirupati Dupatta Scam Exposed – तिरुमला तिरुपती देवस्थानात लाडू भेसळ प्रकरणानंतर आता रेशीम दुपट्ट्यांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. यात तब्बल ५४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची महिती आहे.
२०१५ ते २०२५ या दहा वर्षांच्या काळात तिरुपती देवस्थानात ट्रस्टीने मोठ्या प्रमाणात दुपट्टे खरेदी केले होते. प्रत्येक दुपट्ट्याचा दर १,३८९ रुपये असून ते १०० टक्के शुद्ध रेशीमचे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तपासणीसाठी हे नमुने सेंट्रल सिल्क बोर्ड, मैसूर येथे पाठवले असता ते दुपट्टे शुद्ध रेशीम नसून पॉलिस्टरचे असल्याचे स्पष्ट झाले.
देणगीदार आणि व्हीआयपी दर्शन घेणाऱ्या भक्तांना दररोज दिल्या जाणाऱ्या या दुपट्ट्यांची गुणवत्ता तपासण्याचे आदेश ट्रस्टचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांनी गुप्तचर आणि सुरक्षा विभागाला दिले होते.
तपास पथकाने नमुने बंगळुरू आणि धर्मावरम येथील प्रयोगशाळेत तपासले असता पॉलिस्टरचे असल्याची पुष्टी झाली. हे दुपट्टे गेली अनेक वर्षे एकाच कंपनीकडून पुरवले जात होते. त्यांनी तब्बल १५,००० दुपट्ट्यांचा पुरवठा केला होता. मंदिरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू शंभर टक्के शुद्ध असणे बंधनकारक असतानाही या प्रकरणात सरळसरळ फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे.
घोटाळा समोर आल्यानंतर तिरुपती देवस्थानात ट्रस्टीने तातडीने तपास सुरू केला. सर्व कागदपत्रे, बिले आणि नमुने जप्त करण्यात आले आहेत. हे प्रकरण आता राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून संबंधित पुरवठादारावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले?
महाराष्ट्रातील भ्रष्टाचार उघड! व्हिडिओ, फोटो व्हायरल महेंद्र दळवी आणि नोटा! काम न करता मोबदला
बिबट्यांच्या हल्ल्यांवर वनमंत्र्यांचा अजब-गजब उपाय; ₹1 कोटींच्या शेळ्या जंगलात सोडणार









