Home / महाराष्ट्र / Shirdi Saibaba : शिर्डी साई संस्थानचे उत्पन्न ८५० कोटी; ३ हजार १९८ कोटींच्या ठेवी

Shirdi Saibaba : शिर्डी साई संस्थानचे उत्पन्न ८५० कोटी; ३ हजार १९८ कोटींच्या ठेवी

Shirdi Saibaba : शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने (Saibaba Sansthan Trust) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सादर केलेल्या वार्षिक अहवालातून संस्थानची...

By: Team Navakal
Shirdi Saibaba
Social + WhatsApp CTA

Shirdi Saibaba : शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने (Saibaba Sansthan Trust) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सादर केलेल्या वार्षिक अहवालातून संस्थानची आर्थिक पत मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थानचे उत्पन्न यावर्षी तब्बल ८५०.६२ कोटी रुपयांवर पोहोचले.

मागील वर्षाच्या तुलनेत ते ३१.६२ कोटी रुपयांनी वाढले आहे.भाविकांच्या कल्याणकारी योजनांवरील खर्चातही या वर्षी प्रचंड वाढ केली आहे . हा ६४.७० कोटींचा खर्च वाढून ५५४.०६ कोटी झाला आहे.


संस्थानने २०२४-२५ या आर्थिक वर्षात (Financial year 2024–25)विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ३ हजार १९८ कोटींच्या मुदत ठेवी केल्या आहेत. मागील वर्षी हा आकडा २ हजार ९१६ कोटी होता. या ठेवींमध्ये सुमारे २८२ कोटी रुपयांची वाढ झाली.तर २०२३-२४ मध्ये सुरु झालेल्या १० रुपयांच्या लाडू पाकिटांची (laddu prasad) १.४५ कोटींहून अधिक विक्री झाली होती.

मात्र, २०२४-२५ मध्ये या पाकिटांच्या विक्रीत घट होऊन केवळ विक्री फक्त ३९.६८ लाख झाली.याशिवाय सामान्य दिवसांत शिर्डीत सुमारे ५० हजार भाविक साईंचे दर्शन घेतात. मात्र उन्हाळी सुट्ट्या, दीपावली (Diwali)किंवा इतर सण-उत्सवी काळात ही संख्या दररोज तब्बल २ ते ३ लाखांपर्यंत पोहोचते.


हे देखील वाचा –

महाराष्ट्र शासनाच्या 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; पाहा संपूर्ण लिस्ट

 Maruti Suzuki Ertiga : ‘ही’ आहे देशातील सर्वाधिक विक्री होणारी 7-सीटर कार; किंमत आणि मायलेज जाणून घ्या

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी; रिफंडही मिळणार, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

Web Title:
संबंधित बातम्या