Sanjay Raut on Raj And Uddhav Thackeray : मागच्या काही काळापासून महाराष्ट्रात निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक पक्ष प्रवेश होत आहेत. सत्ताधारी पक्ष महाराष्ट्राच्या काही भागात विरोधात उभे राहताना देखील दिसले याशिवाय काही पक्षत युती होताना देखील दिसत आहे. परंतु अवघा महाराष्ट्र ज्या युतीसाठी प्रतीक्षा करत आहे ती युती अखेर होताना दिसत आहे. इतके वर्ष जनतेच्या मनात एकच प्रश्न होता ते म्हणजे ठाकरे बंधू एकत्र कधी येणार. याबाबत संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच भाष्य करून अधिक स्पष्टता दिली होतीच.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा येत्या आठवड्यात होईल, अशी माहिती आज सकाळीच खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, महापालिका निवडणुका घोषित होताच मुंबईतल्या राजकीय घडामोडींना झपाट्याने वेग आल्याचे दिसून येत आहे. आणि याच पार्शवभूमीवर पत्रकार परिषद संपताच संजय राऊत हे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला देखील गेले होते.
राज्य निवडणूक आयोगातर्फे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षे जो प्रश्न प्रत्यक मराठी माणसाच्या मनात होता त्याने पुन्हा एकदा घर केले. आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघे या निम्मिताने तरी एकत्र लढणार का? या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढले. आणि आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील मोठं विधान केलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत अशी माहिती त्यांनी संजमाध्यमांना दिली आहे. याशिवाय संजय राऊत हे शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घ्यायला देखील गेले होते.
याच पार्शवभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या प्रतिकृतीवर शिवाय राजकीय घडामोडींवर अनेक भाष्य केली आहेत. ते म्हणतात काल मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर माझ्यात प्रचंड उत्साह संचारलेला आहे. हि ट्रीटमेंट चालूच राहील. पण, ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई असणार आहे. मराठी माणूस अगदी कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरले भागच आहे. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून काही पोस्टर्स लावले जात आहेत. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करण्यासाठी हे पोस्टर्स लावण्यात येत आहेत. परंतु त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्यांनी रतो रात हे पोस्टर काढायला लावले. याच कारण काय तर आचारसंहितेचा भंग होत आहे. अश्या परखड शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
संजय राऊत पुढे म्हणाले की, निवडणुका जाहीर होण्याच्या दहा मिनिटाआधीपर्यंत शासनाचे आदेश हे निघतच होते. निधी संदर्भात नगर विकास खात्याचे आदेश येतच होते. विकासाच्या घोषणा देखील सुरु होत्या. आणि हे सगळं पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग चार वाजता निवडणुकीची घोषणा करते. मग हा आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहात. या निवडणुकीत पैशाचे वाटप प्रचंड प्रमाणात होणार आहे. सध्या १५ लाखांची मर्यादा आहे. पण निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकेल का की सत्ताधारी पक्ष फक्त १५ लाखांवरच थांबणार आहेत का? जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये शंभर, ते दीडशे कोटी खर्च करतो. त्याच सत्ताधारी पक्षांनी नगरसेवक फोडण्यासाठी, तसेच त्यांना विकत घेण्यासाठी दोन-दोन, पाच-पाच कोटी रुपये खर्च केले. तो १५ लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहे का? आणि मग निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार? अशी घणाघाती टीका देखील त्यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करत आयोगाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केवळ निवडणूक प्रक्रियेवरच नव्हे, तर मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित मुद्द्यांवरही आपली परखड भूमिका मांडली आहे.
राज-उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार?
मनसे आणि ठाकरे पक्षाच्या युती बद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहांच्या पायावर डोकं ठेवावं लागत अशी मिश्किल टीका देखील त्यांनी केली. आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन… या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महापालिकेमध्ये स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई हे मुंबईचीच होती. पण, ही मुंबई आम्ही अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे की, रहमान डकैत कोण आहे? कोणाला मुंबई विकायची आहे. त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत. मुंबईचं कराचीतील ल्यारी शहर कोणी केलेला आहे हे अख्या मुंबईला माहित आहे, अशी आक्रमक भूमिका देखील त्यांनी घेतली.
पुढे ते म्हणतात येत्या आठवड्यात युतीची घोषणा व्हायला हरकत नाही. आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस या क्षणी आमच्या सोबत आहे, असे मला वाटत नाही. त्यांनी आमच्या सोबत मुंबईच्या लढाईत असायला हवे होते, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांसोबत देखील बोललेलो आहे. पण, त्यांनी ती बाब नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर सोडली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचे आवाहन कायम असेल की, तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका मुंबईच्या लढाईत करूया घेऊ नये. अशी विनंती देखील त्यांनी घेतली आहे. भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील येणार आहे ते लक्षात घ्या, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. याच बरोबर संजय राऊतांसोबतच अनिल परब देखील राज ठाकरेंयांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे या भेटीमागे नक्की काय चर्चा होते हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – Chandrapur Farmer : कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला लावली किडनी विकायला; चंद्रपूरात शेतकऱ्याची दयनीय अवस्था









