Home / महाराष्ट्र / Fake Murder : एक कोटीच्या पॉलिसीसाठी स्वतःच्याच बनावट खुनाचा थरार; एका अनोळखी व्यक्तीला ड्रायव्हिंग सीटवर बसवून लावली आग..

Fake Murder : एक कोटीच्या पॉलिसीसाठी स्वतःच्याच बनावट खुनाचा थरार; एका अनोळखी व्यक्तीला ड्रायव्हिंग सीटवर बसवून लावली आग..

Fake Murder : लातूरमध्ये एका व्यक्तीने एक कोटीच्या पॉलिसीसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीची...

By: Team Navakal
Fake Murder
Social + WhatsApp CTA

Fake Murder : लातूरमध्ये एका व्यक्तीने एक कोटीच्या पॉलिसीसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीची ओळख बँक रिकव्हरी एजंट गणेश चव्हाण अशी देण्यात आली. खरं तर पोलिसांना रविवारी सकाळी औसा तालुक्यात एक जळालेली कार मिळाली. त्यात एक मृतदेह सापडला.

सुरुवातीला असे वाटले की हा मृतदेह गणेश चव्हाण याचा आहे, कारण ती जळालेली कार गणेश चव्हाणच चालवत होता. कुटुंबीयांनाही वाटले की गणेश एखाद्या अपघातात आपल्याला सोडून गेला. मात्र गणेशने या प्रकारा दरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज केला. त्यामुळे तो जाळ्यात फसला गेला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री सुमारे १२:३० वाजता डायल ११२ वर माहिती मिळाली की, वनवाडा रोडवर एका कारला भीषण आग लागली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग विझवल्यानंतर कारमध्ये एक जळालेला मृतदेह आढळला. मृतदेह पूर्णपणे जळालेला होता.त्यामुळे ओळख पटू शकत न्हवती.

त्यानंतर पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतला. त्याने सांगितले की, कार त्याने त्याच्या एका नातेवाईक गणेश चव्हाणला चालवायला दिली होती. त्यानंतर असे सांगण्यात आले की, तो घरी परतला नाही आणि त्याचा फोनही बराच काळ बंद आहे.

तपास पुढे सरकल्यावर गर्लफ्रेंडचं रहस्य उलगडले. लातूरचे पोलीस अधीक्षक (SP) अमोल तांबे यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात मृत व्यक्ती गणेश चव्हाणच असल्याचं वाटत होत. तपास जसजसा पुढे सरकला, तसतसं सोमवारी पोलिसांना जाणवू लागलं की अनेक गोष्टीमध्ये तफावत आहे. त्यांनी चव्हाणच्या आयुष्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर झाला मोठा उलगडा. त्यात त्यांना कळलं की तो एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

तांबे म्हणाले, जेव्हा आम्ही त्या महिलेची चौकशी केली, तेव्हा कळलं की घटनेनंतर गणेश चव्हाण तिला दुसऱ्या फोन नंबरवरून मेसेज करत होता आणि तिच्याशी वारंवार बोलत होता. आणि याच बरोबर ते शव दुसऱ्याच व्यक्तीचं असल्याचं निष्पन्न झालं, आरोपीला पकडलं

पोलिसांना जो माणूस मृत वाटत होता, तो जिवंत निघाला पण गुढ इथेच सुटलं न्हवत आता पोलिसांना जाणून घ्यायचे होते की, कारमध्ये सापडलेला मृतदेह कोणाचा होता आणि त्यांनी चव्हाणच्या दुसऱ्या फोन नंबरचा मागोवा घ्याल सुरवात केली. यामुळे ते कोल्हापूर आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे पोहोचले, जिथे चव्हाण सापडला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

चव्हाणची चौकशी केल्यावर पोलिसांना कळले की, त्याने एक कोटी रुपयांची जीवन विमा पॉलिसी घेतली होती आणि त्याला गृहकर्ज फेडण्यासाठी या पैशांची गरज होती. हे मिळवण्यासाठी त्याने एका खुनाचा कट रचला जेणेकरून तो स्वतःच्या मृत्यूचे नाटक अगदी सहज रित्या करू शकेल.

या कबुलीजबाब त्याने केलेल्या मृत्यूचा थरार सांगितलं आहे, अनोळखी व्यक्तीला गाडीत बसवून आग लावली चव्हाणने औसा येथील तुळजापूर टी-जंक्शनवर गोविंद यादव नावाच्या एका व्यक्तीला लिफ्ट दिली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की यादव नशेत होता आणि चव्हाणने याचा गैरफायदा घेतला. गाडी पार्क केल्यानंतर यादवने काही खाल्ले आणि लवकरच गाडीत निपचित पडला.

नंतर चव्हाणने त्याला ड्रायव्हरच्या सीटवर ओढले, त्यानंतर त्याला सीटबेल्ट लावला, सीटवर माचिसच्या काड्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्या आणि त्याला आग लावली. याचबरोबर चव्हाणने आपले ब्रेसलेट देखील यादवजवळ सोडले. यासंदर्भात सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


हे देखील वाचा – Prithviraj Chavan : भारताचा पाकविरोधात पहिल्याच दिवशी पराभव? पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर दावा..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या