Home / महाराष्ट्र / Pradnya Satav entry into the BJP : भाजपकडून काँग्रेसला मिळणार तगडा झटका? स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव करणार भाजपात प्रवेश?

Pradnya Satav entry into the BJP : भाजपकडून काँग्रेसला मिळणार तगडा झटका? स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव करणार भाजपात प्रवेश?

Pradnya Satav entry into the BJP : राज्य निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. यात आपसात...

By: Team Navakal
Pradnya Satav entry into the BJP
Social + WhatsApp CTA

Pradnya Satav entry into the BJP : राज्य निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. यात आपसात युती, किंवा मग एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश यासगळ्या घडामोडीनां वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आणि आता अशातच काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव(Rajiv Satav)यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव ( Pradnya Satav) या देखील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. त्यामुळे आता शिवसेने पाठोपाठच काँग्रेसला देखील भाजपने तगडा झटका दिला असल्याचे देखील बोलले जात आहे.

हिंगोलीच्या राजकारणात माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या नावाचा धुराळा होता. मधुर वाणी, सुसंघटित संगठन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व या जोरावर सातव यांनी हिंगोलीला काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला बनवला. पण कोविडमध्ये सातव यांचा दुर्दैवी मुर्त्यू झाला. आणि त्यानंतर हिंगोलीत काँग्रेसचा दबदबा कमी झाला. त्यातच आता प्रज्ञा सातव्या उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्या सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. याबाबत मोठ्या हालचाली भाजपकडून होताना देखील दिसत आहेत.

नक्की कोण आहेत प्रज्ञा सातव? (Who Is Pradnya Satav)
डॉ. प्रज्ञा सातव या हिंगोलीचे काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान बळकट केले. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून देखील ओळखले जायचे. २०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा देखील समावेश होता. त्यानंतर मात्र राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान बळकट केले. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून देखील काम केले होते. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे त्यांनी भुषविली होती.

राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं २०२१ मध्ये आजारपणामुळे दुर्दैवी निधन झाले. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार देखील आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर बिनविरोधी त्यांची निवड झाली होती. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर त्या निवडून आल्या होत्या. आणि २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे.


हे देखील वाचा – निवडणुकीच्या रिंगणात आमिषांचा पाऊस! मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुणी वाटतंय जमीन तर कुणी देतय रोकड

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या