Home / महाराष्ट्र / Lionel Messi Vantara Visit : स्टार फुटबॉलर लिओ मेस्सीने दिली ‘वनतारा’ला भेट; भेटीचे फोटो होत आहेत व्हायरल

Lionel Messi Vantara Visit : स्टार फुटबॉलर लिओ मेस्सीने दिली ‘वनतारा’ला भेट; भेटीचे फोटो होत आहेत व्हायरल

Lionel Messi Vantara Visit : फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी याचा भारत दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या दौऱ्यावर मेस्सी भारतातील विविध...

By: Team Navakal
Lionel Messi Vantara Visit
Social + WhatsApp CTA

Lionel Messi Vantara Visit : फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी याचा भारत दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या दौऱ्यावर मेस्सी भारतातील विविध शहरांना भेटी देत असल्याचे दिसून येत आहे. मेस्सी आतापर्यंत आपल्या भारत दौऱ्यामध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि बडे राजकीय नेतेमंडळी यांना देखील भेटला आहे. रविवारी मेस्सीची मुंबईच्या वानखेडे मैदानावर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना देखील भेटला. तसेच, क्रिकेटचे सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबाद स्टेडियममध्ये मेस्सीने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याशीही देखील त्याने संवाद साधला.

या सर्व व्यस्त कार्यक्रमानंतर मेस्सीने अनंत अंबानी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वनतारा येथे देखील भेट दिली. त्यावेळी अनंत अंबानी, त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी त्यांचे मोठ्या स्वागत केले. आणि यावेळी मेस्सीने देखील सनातन धर्म आणि हिंदू चालरितींनुसार महाआरती, विविध हिंदू देवदेवतांची पूजा आणि शिवाभिषेक देखील मोठ्या उत्साहाने केला.

या केंद्रात प्रत्येक गोष्टींची सुरुवात सनातन धर्मानुसार आशीर्वाद घेऊन केली जाते. निसर्गाविषयी आदर आणि सर्व सजीवांप्रती सन्मान अधोरेखित करणारी ही परंपरा आहे. मेस्सींची ही भेट या सांस्कृतिक मूल्यांची साक्ष देणारी ठरली. मेस्सीच्या वनतारा भेटीबाबात वनताराकडून देखील आदीकृत माहिती देण्यात आली. वन्यजीवांचा आश्रय पाहिला आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांशी देखील मेस्सीने संवाद साधला. या भेटीदरम्यानच्या त्याच्या कृतींमधून तो ज्या नम्रतेसाठी आणि मानवतावादी मूल्यांसाठी ओळखला जातो, तीच मूल्ये प्रकर्षाने दिसून आली.

पुढे वनताराने या भेटी बद्दल अधिक माहिती दिली आहे ते म्हणतात की, मेस्सी, त्याचा इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांच्यासोबत यांचे भव्य पारंपरिक पद्धतीने स्वागत देखील करण्यात आले. यावेळी लोकसंगीत, देवदेवतांचे आशीर्वाद आणि पवित्रतेचे प्रतीक असलेल्या फुलांची वृष्टी आणि पारंपरिक महाआरतीसुद्धा यावेळी करण्यात आली. यावेळी मेस्सीनेही मंदिरातील या महाआरतीत सहभाग घेतला होता. त्याच्या वनतारातील भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार वायरल होताना दिसत आहेत.


हे देखील वाचा – पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा! ‘एपस्टीन फाईल्स’मुळे देशाचा पंतप्रधान बदलणार? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या