Home / महाराष्ट्र / Mumbai Mahapalika Election : भाजपाचा मुंबई महापौर पदावर हक्क !जागावाटपाचे घोडे अडले! आज बैठक

Mumbai Mahapalika Election : भाजपाचा मुंबई महापौर पदावर हक्क !जागावाटपाचे घोडे अडले! आज बैठक

Mumbai Mahapalika Election – शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Mahapalika Election) जागा वाटपाचा मुद्दा क्लिष्ट बनला...

By: Team Navakal
bmc
Social + WhatsApp CTA

 Mumbai Mahapalika Election – शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Mahapalika Election) जागा वाटपाचा मुद्दा क्लिष्ट बनला आहे. भाजपाने शिवसेनेला फक्त 52 जागांचाच प्रस्ताव दिला आहे. भाजपाने महापौर पदावर हक्क सांगितल्याने शिवसेनेत नाराजी आहे. उद्या याबाबत दोन्ही पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे.


शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या जागा वाटपाच्या बैठकीत शिवसेनेला फक्त 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला, त्यातच शिवसेनेला त्यांच्या मित्रपक्षालाही यातूनच जागा द्याव्या लागणार असल्याने शिवसेनेत अस्वस्थता  आहे. भाजपाने स्वतः मात्र 150 जागा लढवणार असून त्यांनी आपल्या मित्रपक्षाला कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले असल्याने भाजपाच्या जागा वाढणार आहेत. यामुळे शिवसेनेला आपली युतीत फरफट होते आहे असे वाटत असून भाजपाने जोडीला मुंबई महापौर पदावर दावा सांगितला असल्याने बैठकीतून काही ठोस निर्णय झालेला नाही.


दोन्ही बाजूनी लालबाग, परळ आणि दादर आदी जागांसाठी आग्रह धरल्याने जागा वाटपाचे घोडे अडून बसले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उद्या आणखी एक बैठक दोन्ही पक्षाचे नेते करणार आहेत. याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असा विश्वास आहे. आता बातम्या पसरतील की जागा वाटपात इतक्या जागा मिळणार आणि तितक्या जागा मिळणार आहेत. त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

हिवाळ्यात हे उबदार घरगुती पदार्थ खा..

धनंजय मुंडे अमित शाहांच्या भेटीला; कोकाटेंच्या जागी संधी मिळणार?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या