Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : एकनाथ शिंदेंचं मुंबईच बजेट १० हजार कोटी संजय राऊतांचा मोठा आरोप; उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये दिल्याचा दावा..

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंचं मुंबईच बजेट १० हजार कोटी संजय राऊतांचा मोठा आरोप; उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये दिल्याचा दावा..

Sanjay Raut : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर दर दिवशी राजकीय वर्तुळात नव नवीन चर्चाना उधाण येते. शिवाय सभा रॅली यामधून प्रत्यक...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर दर दिवशी राजकीय वर्तुळात नव नवीन चर्चाना उधाण येते. शिवाय सभा रॅली यामधून प्रत्यक पक्षातले बडे नेते शिवाय उमेदवार हे जनतेपर्यंत आपले म्हणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आदित्य ठाकरेंनी मुंबईत सभा घेऊन प्रचार सुरवात केली त्यानंतर फडणवीसांनी सुद्धा काल अंबरनाथमध्ये जाहीर सभा घेतली आणि त्यांच्या या सभेला जनतेचा भरभरून प्रतिसाद देखील आला. पण निवडणूक म्हटलं कि आरोप प्रत्यारोप आले. याच पार्शवभूमीवर संजय राऊतांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना आपले लक्ष केले आहे.

या आधीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला अमित शहानंची टेस्ट ट्यूब बेबी म्हणून हिनवले आणि याशिवाय ठाकरे बंधूंच्या युती बाबत देखील त्यांनी भाष्य केले होते. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा केली. याशिवाय त्यांनी सत्ताधार्यांना सुद्धा आपले लक्ष बनवले आहे. शिवाय दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर देखील त्यांनी टीका केली आहे. अजित पवारांशी कोणतीही युती म्हणजे भाजपसोबत हातमिळवणी असलयाचे ते म्हणाले. अजित पवार भाजपचे हस्तक असल्याचे देखील ते म्हणले. महापौर कोणाचा होणार मनसेचा कि ठाकरेंचा असा प्रश्न विचारला असता त्यांनी याचे चोख उत्तर दिले. महापौर हा मनसे आणि शिवसेनेचा असणार तो ठाकरे बंधूंचा असेल, तो महाराष्ट्रातला मराठी माणसांचा महापौर असेल असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंवर देखील त्यांनी कडाडून टीका केली आहे. शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागते हे या सरकारचे दुर्देव असल्याचे देखील ते म्हणले. सत्ताधारी निवडणुकांवर कोटीच्या कोटी खर्च करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. शिवाय या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष करत एकनाथ शिंदेंचं मुंबईच बजेट १० हजार कोटी असल्याचा दावा देखील केला आहे. शिंदे प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये देणार असल्याचे देखील ते म्हणले. हे सगळे पैसे त्यांनी महापालिकेच्या ठेकेदाराकडून घेतल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. किंवा ते पैसे ड्रग्स मधून आले असल्याची टीका देखील त्यांनी केली.

याशिवाय त्यांनी एकनाथ शिंदेंचा भाऊ प्रकाश शिंदेंच्या ड्रग्स प्रकरणावर देखील त्यांनी ताशेरे ओढले आहेत. साताऱ्यातील ड्रग्स प्रकरणाची चौकशी हायलेव्हल ऐसाआयटीमार्फत करावी अशी विनंती देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे आता राज्यातील निवडणूका काय नवीन वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा – Severe Cold : हिवाळ्यात हे उबदार घरगुती पदार्थ खा..

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या