Home / महाराष्ट्र / UBT MNS Alliance : ठाकरे बंधूंचा धमाका! अजून ४ महापालिकेत एकत्र लढणार?

UBT MNS Alliance : ठाकरे बंधूंचा धमाका! अजून ४ महापालिकेत एकत्र लढणार?

UBT MNS Alliance : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे (Municipal elections) बिगुल वाजले असून राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग आल्याचे दिसते...

By: Team Navakal
UBT MNS Alliance
Social + WhatsApp CTA

UBT MNS Alliance : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे (Municipal elections) बिगुल वाजले असून राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग आल्याचे दिसते आहे. अशातच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत (Shiv Sena UBT MNS Alliance) एक मोठी बातमी आता समोर आली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकनंतर आता विदर्भातील आणखी चार महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती होणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातम्यांना जोर वाढला आहे. त्यामुळे आता शिवसेना-मनसेची युती एकूण आठ जिल्ह्यांतील महापालिकांमध्ये होणार असल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरक यांनी माध्यमांशी बोलताना याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली. विदर्भातील चारही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजू उंबरकर हे आज अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा दौऱ्यावर उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक देखील घेतली. याच बैठकीत अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या. यावरून विदर्भात मनसे-शिवसेना युतीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येते.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये आधीच ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यात आता विदर्भातील चार महापालिकांची भर पडल्याने राज्याच्या राजकारणात ‘ठाकरे ब्रँड’ पुन्हा एकदा प्रभावीपणे उभा राहणार असल्याचे धमाकेदार चित्र सध्या आहे. त्यामुळे हि युती राज्याच्या राजकारणाला कितपत हलवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा – Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातच अटक होणार? माणिकराव कोकाटेंच्या बंधू विरोधात अटक वॉरंट जारी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या