Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या संधर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. शासकीय सदनिका घोटाळ्यात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची दोन्ही खाती त्यांच्याकदूम काढून घेण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटे यांना सावरण्याच्या प्रयत्नात असले; तरीही भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. माणिकराव कोकाटे यांनी काल रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता पण हा राजीनामा अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याच्या बातम्या जोर धरत आहेत.
काल अटक वॉरंट जारी होण्याच्या हालचाली सुरू असतानाच माणिकराव कोकाटे हे तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी देखील नेण्यात आले आहे. उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना काल दुपारी रुग्णालयात दाखल केले. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती आहे.
हृदयाशी संबंधित त्रासही जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने उपचार सुरु केले. सध्या डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा – Mumbai Underground Metro : भुयारी मेट्रो पुन्हा एकदा कोलमडली; मेट्रोला तांत्रिक बिघाडाचा फटका









