Home / महाराष्ट्र / Mumbai municipal elections : मुंबईत राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष ! भाजपा-शिंदे एकत्र लढणार

Mumbai municipal elections : मुंबईत राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष ! भाजपा-शिंदे एकत्र लढणार

Mumbai municipal elections – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai municipal elections) शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील जागावाटपाबाबत आज दुसरी...

By: Team Navakal
bmc
Social + WhatsApp CTA

 Mumbai municipal elections – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai municipal elections) शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील जागावाटपाबाबत आज दुसरी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 150 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून उर्वरित 77 जागांवर लवकरच सविस्तर चर्चा होणार आहे अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत आमचा संबंध नाही असा पुनरुच्चार देखील साटम यांनी केला.


यावेळी बोलताना अमित साटम म्हणाले की, जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा, शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची महायुती पूर्णपणे कटिबद्ध आहे. महापालिकेला विकून खाणार्‍यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. राष्ट्रवादीने मुंबईचे नेतृत्व बदलले, तर आम्ही त्यांचे स्वागत करण्यास
तयार आहोत. दरम्यान बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनीही महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत महायुती 150 पेक्षा अधिक जागा जिंकेल. उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. आजच्या बैठकीत आम्ही निवडणूक लढवण्याची रुपरेषा आणि ज्या जागांवर एकमत झाले आहे, यावर चर्चा केली.

————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

राज्यातील विविध दंडाधिकारी न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण

 अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या