Mira Bhayandar Leopard Attack : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये निवडणूक हा जेवढा चर्चेचा विषय बनला आहे, तेवढाच बिबट्या देखील चर्चेचा विषय बनला आहे. बिबट्याचे सततचे हल्ले याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. याशिवाय बिबट्यांच्या हल्ल्यांचे (Leopard Attack) प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे.
पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये लोकवस्तीत देखील बिबट्याचे अनेकदा दर्शन झाल्याचे दिसून आले. बिबट्याचा वावर असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड गाजताना दिसत आहेत. याची हद्द म्हणजे आज मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत पसरल्याचे चित्र आहे.
मीरा-भाईंदरमधील (Mira Bhayandar Leopard Attack) तलाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बिबट्या शिरला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ३ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याा जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. बिबट्याच्या (Mira Bhayandar Leopard Attack) हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.(Leopard Attack)
अधिकच्या माहितीनुसार, आज सकाळी मीरा-भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील पारिजात नावाच्या इमारतीत हा बिबट्या शिरला. त्या इमारतीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मीरा-भाईंदरच्या बीपी रोड मागच्या तलावरोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या पारिजात इमारतीत आज सकाळी ८ च्या सुमारास हा बिबट्या दिसला होता आणि त्यानंतर तेथील एका घरात हा बिबट्या थेट घुसला, तेव्हा घरात ४ माणसं होती. त्या घरात २५ वर्षांची एक तरूणी आणि काही पुरूष होते. या घरात शिरलेल्या बिबट्याने सर्वांवर हल्ला चढवला. त्यांचे आवाज, आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली. (Mira Bhayandar Leopard Attack)
परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन करून बिबट्या शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी कोणत्याही क्षणी घटनास्थळी पोचतील. घटनास्थली नागरिकांची, आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलीस घटनास्थळी असून या बिबट्याला एका रूममध्ये बंद करून ठेवण्यात आले आहे. शिवाय त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्याप्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हे देखील वाचा – NASA Asteroid Tracking : पृथ्वीच्या दिशेने येतायत 10 लघुग्रह! नासाचा हाय-अलर्ट; जाणून घ्या मानवासाठी धोका किती?









