Home / महाराष्ट्र / Kolhapur murder Case : कोल्हापुरातील धक्कादायक घटना; पोटच्या लेकानेच केला आई- वडिलांचा खूण

Kolhapur murder Case : कोल्हापुरातील धक्कादायक घटना; पोटच्या लेकानेच केला आई- वडिलांचा खूण

Kolhapur murder Case : आई आणि बापाला लेकाने एकदम शांत डोक्याने संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात घडली...

By: Team Navakal
Kolhapur murder Case
Social + WhatsApp CTA

Kolhapur murder Case : आई आणि बापाला लेकाने एकदम शांत डोक्याने संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात घडली आहे. महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा विकृतपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लेकानेच आपल्या जन्मदात्या आई-बापाला का संपवल असेल हा एकच प्रश्न उध्दभवताना दिसत आहे.

या मुलाने स्वतःच्या आई-बापाला संपवले आणि स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेत विजयमाला नारायण भोसले वय वर्ष ७० आणि नारायण गणपतराव भोसले वय वर्ष ७८ या वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोक पसरला आहे. तर त्यांचा मुलगा सुनील नारायण भोसले वय ४८ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याची माहिती आहे. संशयित सुनील भोसले याने अत्यंत शांत डोक्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले. आई विजयमाला भोसले यांच्या हातातील नस धारधार काचेच्या वस्तूने या विकृत नराधमाने कापली. तसेच चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वर्मी घाव घालत निर्घृण हत्या केली. तर वडील नारायण भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार शस्त्राने प्रहार करण्यात आला.

या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून खून केल्यानंतर संशयित सुनिल भोसले स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा खून त्याने का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही या प्रकरणाचा अधिक तपास कोल्हापूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.


हे देखील वाचा – Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम यांच्या विरोधात अर्ज; आरोपींच्या वकिलांची मागणी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या