Home / महाराष्ट्र / Railway Block : कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी ब्लॉक; ३० दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक

Railway Block : कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी ब्लॉक; ३० दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक

Railway Block : शनिवार रविवार म्हटलं कि ब्लॉक लागण हि जवळजवळ परंपराच बनली आहे. त्यामुळे शनिवार पासूनच ब्लॉकच्या बातम्या यायला...

By: Team Navakal
Railway Block
Social + WhatsApp CTA

Railway Block : शनिवार रविवार म्हटलं कि ब्लॉक लागण हि जवळजवळ परंपराच बनली आहे. त्यामुळे शनिवार पासूनच ब्लॉकच्या बातम्या यायला सुरवात होते. पण आताचा हा ब्लॉक हा केवळ १ किंवा २ दिवसाचा नसून हा ब्लॉक ३० दिवसांचा असणार आहे. पश्चिम रेल्वेकडून कांदिवली आणि बोरिवली विभागावर सहावी लाईन पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक २० किंवा २१ डिसेंबर २०२५ च्या रात्रीपासून सुरू होऊन १८ जानेवारी २०२६ पर्यंत चालू राहणार आहे.

या कामांत कांदिवली आणि बोरिवली स्थानकांवरील ट्रॅक स्लीपिंग तसेच अनेक क्रॉसओव्हरचे इन्सर्शन आणि रिमूव्हल यांचा देखील समावेश आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड इक्विपमेंटशी संबंधित महत्त्वाची कामे केली जाणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. परिणामी काही उपनगरीय, पॅसेंजर तसेच मेल/एक्सप्रेस गाड्यांना देखील याचा मोठा फटका बसेल. या कालावधीत पाचव्या लाईनवरील प्रवासी गाड्यांचे संचालन निलंबित राहील तसेच इतर लाईनवर वेगमर्यादा लागू राहणार आहेत. पाचव्या लाईनवर धावणाऱ्या सर्व मेल/एक्सप्रेस आणि उपनगरीय गाड्या अंधेरी/गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान फास्ट लाईनवरूनच चालविण्यात येणार आहे.


हे देखील वाचा – कोल्हापुरात महायुतीचा ‘गेम प्लॅन’ तयार! सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी देणार जोरदार टक्कर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या