Nagarparishad Election 2025 : आज राज्यात निवडणुकांची धामधूम सुरु आहे आणि याच पार्शवभूमीवर राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह अनेक जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
थंडीच्या कडाक्यातही आज मतदार आपल्या विश्वासू उमेदवारासाठी मतदान करण्यास बाहेर पडला आहे. तर काही मतदान केंद्रावर मात्र संथ गतीने मतदारांनी हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सकाळी ७:३० ते संध्यकाळी ५:३० या वेळेत हे मतदान होणार आहे. पण या सगळ्यागोष्टी असल्या तरी राज्यातील काही मतदानकेंद्रावर निवडणूक प्रक्रियेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये अकोल्याच्या बाळापुरात प्रभाग ५ मधील बूथ क्रमांक एकवर EVM मशीन बंद पडली आहे. तर एकीकडे यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असून एका केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. सोबतच फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक १३ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचे बटन दाबत नसल्यामुळे मात्र एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत कोण कोणत्या ठिकाणी झाला ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
अकोला (Akola) : EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; ऐनवेळी बदलण्यात आली ईव्हीएम मशीन
अकोल्याच्या बाळापुरात प्रभाग क्रमांक ५ मधील बूथ क्रमांक एकवर ईव्हीएम (EVM मशीन) बंद पडली आहे. जवळपास २० मिनटे हि मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. दरम्यान, ऐनवेळी नगरपालिकेच्या आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हि ईव्हीएम (EVM) मशीन बदलण्यात आली. मशीनच्या सॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरी ईव्हीएम मशीन बसवण्यात आली. बाळापूरातील कासारखेड जुनी इमारत दक्षिण भागातील नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. दरम्यान, बंद पडलेल्या ईव्हीएम जवळपास मशीनमध्ये १२ जणांचं मतदान झालं होतं.
यवतमाळ (Yavatmal) : यवतमाळमध्ये २० मिनिटांपासून मतदान ठप्प, मतदारांची लागली भली मोठी रांग
यवतमाळ नगरपरिषदेत देखील एका केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. प्रभाग क्रमांक २७ मधील ध्रुव प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावरील खोली क्रमांक पाच मधील ईव्हीएममध्ये हा तांत्रिक बिघाड झाल्याने २० मिनिटांपासून मतदान ठप्प आहे. त्यामुळे मतदारांची मोठीच्या मोठी रांग लागलायचे चित्र सध्या आहे.
फलटण : ईव्हीएम मशीनचे बटन दाबत नसल्याने एकच गोंधळ
दरम्यान, फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक १३ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचे बटन दाबत नसल्यामुळे एकच गोंधळ उडाला. परिणामी, प्रभाग क्रमांक १३ मधील चार नंबरच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे. या प्रकरणानंतर समशेर सिंह नाईक निंबाळकर स्वतः मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आहे.
फुलंब्री (Phulambri) : मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याच्या धक्कादायक प्रकार
दुसरीकडे, पैठणनंतर आता ऐन मतदानाच्या एक दिवस आधीच फुलंब्री शहरात मतदान केंद्रा बाहेर जादूटोणा केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारत माता शाळा मतदान केंद्रावर बाहेर हा खळबळजनक प्रकार घडला आहे. एक काळी बाहुली त्याला पिना टोचलेल्या, लिंबू आणि इतर साहित्य इथे दिसून आलं आहे. हा सगळा प्रकार कोणी केला याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकलेली नाही.
हे देखील वाचा – Ambernath Election 2025 : अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार; भिवंडीतून आणल्या महिला मतदार; नेमकं प्रकरण काय?









