Home / महाराष्ट्र / BMC Election : मावितात फूट! काँग्रेस स्वबळावर लढणार रमेश चेन्नीथला यांचे विधान

BMC Election : मावितात फूट! काँग्रेस स्वबळावर लढणार रमेश चेन्नीथला यांचे विधान

BMC Election : राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी...

By: Team Navakal
BMC Election
Social + WhatsApp CTA

BMC Election : राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ७: ३० ते संध्यकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार आहे. तसेच २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. याच पार्शवभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर असणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट या महापालिकेत सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष मुंबईत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहे.

याच पार्शवभूमीवर महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसने आता मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकांची दिशा बदल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी याबाबत अधिक स्पष्टता दिली आहे ते म्हणतात की, मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास आद्यपही झालेला आहे. त्यामुळेच आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माविआत फूट पडल्याचे यामुळे अधिकृत झाले आहे. यासगळ्याबाबी लक्षात घेता आता मुंबईची हि निवडणूक कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुढे ते असेही म्हणाले कि, ‘आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे तसेच आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू असे जाहीर आश्वासन देखील त्यांनी दिले. आम्ही याबाबतचा जाहीरनामा तुमच्यासमोर सादर करू, त्यामुळे मतदारांना मी आवाहन करतो की, आम्हाला साथ द्या आम्ही मुंबईचा विकास करू.’ असे आव्हान देखील यावेळी त्यांनी केले आहे.

हे देखील वाचा – Leopard News : जुन्नरचे १०० बिबटे होणार वनताराला स्थलांतरीत; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बिबट्या थेट भाईंदरमध्ये..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या