Home / राजकीय / National Herald Case : सोनिया,राहुल गांधींना दिलासा दिल्याविरोधात ईडी हायकोर्टात

National Herald Case : सोनिया,राहुल गांधींना दिलासा दिल्याविरोधात ईडी हायकोर्टात

National Herald Case – नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald case)काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्याविरूद्धचे इडीचे आरोपपत्र स्वीकारण्यास...

By: Team Navakal
National Herald Case
Social + WhatsApp CTA


National Herald Case – नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald case)काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्याविरूद्धचे इडीचे आरोपपत्र स्वीकारण्यास नकार देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate)दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court)आव्हान दिले आहे.पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.


नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया (Congress leaders Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांच्याविरूद्ध मनी लाँडरिंगचा (Money-laundering case)गुन्हा नोंदविला आहे. या खटल्यात १६ डिसेंबर रोजी ईडीने सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनी लाँडरिंग कायद्यातील तरतुदीनुसार या कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पहिल्यांदा एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे.

ईडी किंवा सीबीआयने (CBI) या प्रकरणात एफआयआर दाखल केलेला नाही. ईडीने जो तपास केला तो खासगी तक्रारीवरून केला आहे. अशा प्रकारे एफआयआरवर आधारित नसलेल्या खटल्यात आरोपपत्र स्वीकारणे कायद्याने योग्य नाही,असे निरीक्षण नोंदवत कनिष्ठ न्यायालयाने ईडीचे आरोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला होता.कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयामुळे सोनिया आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला होता.


हे देखील वाचा –

आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! अनकॅप्ड खेळाडू मालामाल; पाहा संघांनी कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?

वैमानिकाची प्रवाशाला मारहाण ; एअर इंडियाकडून निलंबन

राज्य उद्योग खात्याकडून अमेडियाला दिलेले पत्र रद्द

Web Title:
संबंधित बातम्या