Home / महाराष्ट्र / Shalini Patil : माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Shalini Patil : माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Shalini Patil : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४...

By: Team Navakal
Shalini Patil
Social + WhatsApp CTA

Shalini Patil : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही महिन्यान पासून शालिनी ताई या आजारी होत्या. माहीम मधील निवासस्थानी त्याच निधन झालं.

साताऱ्यातील कोरेगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत्या. अंतुलेंच्या मंत्रिमंडळात त्या महसूलमंत्री देखील होत्या. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पहिली हाक दिली होती. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोण होत्या शालिनाताई पाटील?
शालिनीताई पाटील यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय असा राहिला आहे. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. १९८० च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद देखील भूषवले होते. ९१८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते.

त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील केले होते, तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून १९९९ ते २००९ या काळात त्या आमदार म्हणून देखील निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी १९९० मध्ये जनता दलातून आणि १९९५ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नव्हते.

हे देखील वाचा – National Herald Case : सोनिया,राहुल गांधींना दिलासा दिल्याविरोधात ईडी हायकोर्टात

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या