Home / देश-विदेश / South Africa Shooting : दक्षिण आफ्रिकेत बेधुंद गोळीबार; गोळीबारात १० जणांचा मृत्यू

South Africa Shooting : दक्षिण आफ्रिकेत बेधुंद गोळीबार; गोळीबारात १० जणांचा मृत्यू

South Africa Shooting : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बेकरसडल टाऊनशीपमध्ये बेछूट गोळीबार करण्याची गंभीर घटना घडली आहे. या गोळीबारात १०...

By: Team Navakal
South Africa Shooting
Social + WhatsApp CTA

South Africa Shooting : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बेकरसडल टाऊनशीपमध्ये बेछूट गोळीबार करण्याची गंभीर घटना घडली आहे. या गोळीबारात १० लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच यात इतर १० लोक जखमी झाले आहेत. या महिन्यातील दक्षिण आफ्रिकेतील ही दुसरी मास शुटींगची खळबळजनक घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग येथून नैऋत्य दिशेला ४० किमी अंतरावर असलेल्या बेकरसडल टाऊनशीपमध्ये आज सकाळी बेसुमार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, काही लोक रस्त्यावर उभे असताना त्यांच्यावर अज्ञात इसमाने अचानक गोळीबार केल्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

गौतेंग प्रांतातील पोलीस प्रवक्त्या ब्रिगेडियर ब्रेंडा मुरिडिली यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. त्या सांगतात की, पोलीस यंत्रणा मृत्युमुखी पडलेल्या पीडितांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, बेकरसडल टाऊनशीपच्या एका बारजवळ ही गंभीर घटना घडली. याच ठिकाणी जवळच एक सोन्याची खाण देखील आहे. याठिकाणी काही काळ विनापरवाना मद्यविक्री देखील सुरू होती.

या महिन्यातील मास शुटिंगची ही दुसरी मन हादरवणारी घटना आहे. ६ डिसेंबर रोजी प्रिटोरियाजवळ एका वसतिगृहात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात १२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ज्यात तीन वर्षांच्या एका बालकाचा देखील समावेश होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक गुन्हे घडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हे देखील वाचा – Haji Mastan Daughter : अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची थेट पंतप्रधानांना साद; हसीन मस्तानला करावा लागला अत्याचाराचा सामना, न्यायाची केली मागणी..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या