Home / लेख / WhatsApp Ghost Pairing म्हणजे काय? तुमच्या नकळत कोणीतरी चोरून वाचतंय तुमचे चॅट्स; ‘या’ एका चुकीमुळे व्हाल कंगाल

WhatsApp Ghost Pairing म्हणजे काय? तुमच्या नकळत कोणीतरी चोरून वाचतंय तुमचे चॅट्स; ‘या’ एका चुकीमुळे व्हाल कंगाल

WhatsApp Ghost Pairing : स्मार्टफोनच्या जगात WhatsApp हे संवादाचे सर्वात सोपे साधन असले, तरी ते आता सायबर गुन्हेगारांचे मुख्य लक्ष्य...

By: Team Navakal
WhatsApp Ghost Pairing
Social + WhatsApp CTA

WhatsApp Ghost Pairing : स्मार्टफोनच्या जगात WhatsApp हे संवादाचे सर्वात सोपे साधन असले, तरी ते आता सायबर गुन्हेगारांचे मुख्य लक्ष्य बनले आहे. सध्या ‘WhatsApp Ghost Pairing’ या एका नवीन प्रकारच्या सायबर हल्ल्याने तज्ज्ञांची झोप उडवली आहे.

हा प्रकार इतका छुपा आहे की, तुमचे खाते हॅक झाले आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत समजत नाही आणि तुमच्या नकळत तुमची सर्व खाजगी माहिती चोरीला जाते.

नेमकं काय आहे ‘Ghost Pairing’?

‘Ghost Pairing’ हा WhatsApp मधील ‘Linked Devices’ (लिंक्ड डिवाइसेस) या अधिकृत सुविधेचा गैरवापर करून केला जाणारा हल्ला आहे. सामान्यतः आपण आपले व्हॉट्सॲप लॅपटॉप किंवा दुसऱ्या फोनवर वापरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करतो. याच प्रक्रियेचा फायदा हॅकर्स घेतात.

ते तुम्हाला एखादा भावनिक किंवा तातडीचा मेसेज पाठवून, किंवा व्हॉट्सॲप सपोर्ट टीमचे प्रतिनिधी असल्याचे भासवून एक क्यूआर कोड स्कॅन करायला लावतात. एकदा का तुम्ही तो कोड स्कॅन केला की, तुमचे व्हॉट्सॲप खाते त्यांच्या डिव्हाइसवर ‘पेअर’ किंवा लिंक होते.

हे हॅकिंगपेक्षाही धोकादायक का?

१. अदृश्य अस्तित्व: पारंपरिक हॅकिंगमध्ये तुमचे खाते लॉग-आऊट होते किंवा तुम्हाला पासवर्ड बदलल्याचा मेसेज येतो. मात्र, ‘घोस्ट पेअरिंग’मध्ये तुमचे व्हॉट्सॲप तुमच्या फोनवर अगदी व्यवस्थित सुरू राहते.

२. रिअल टाइम पाळत: हॅकर एखाद्या भूताप्रमाणे (Ghost) बॅकग्राउंडमध्ये राहून तुमचे सर्व मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि कॉन्टॅक्ट्स रिअल टाइममध्ये पाहत असतो.

३. ओळखणे कठीण: अनेक वापरकर्ते आपले व्हॉट्सॲप किती डिव्हाइसशी जोडलेले आहे, हे कधीच तपासात नाहीत. याचाच फायदा घेऊन हॅकर अनेक महिने तुमच्या माहितीवर डल्ला मारू शकतो.

अशा प्रकारे ओळखा आणि टाळा हा धोका

सायबर गुन्हेगार सहसा “तुमचे खाते व्हेरिफाय करा”, “मोफत बक्षीस जिंका” किंवा “तुमच्या मित्राला तुमची मदत हवी आहे” अशा प्रकारच्या मेसेजचा वापर करून तुम्हाला अडकवतात. यापासून वाचण्यासाठी खालील उपाय करा:

  • Linked Devices तपासा: आठवड्यातून किमान एकदा व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘Linked Devices’ तपासा. तिथे तुम्हाला तुमचे नसलेले कोणतेही डिव्हाइस दिसल्यास त्यावर क्लिक करून ‘Log Out’ करा.
  • अनोळखी क्यूआर कोड: कोणाशीही बोलताना किंवा संशयास्पद वेबसाइटवर क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नका.
  • टू-स्टेप व्हेरिफिकेशन: तुमच्या व्हॉट्सॲपवर 2-step verification नक्की सुरू करा. यामुळे तुमच्या खात्याला सुरक्षेचा अतिरिक्त स्तर मिळेल.

सतर्क राहणे हाच ‘घोस्ट पेअरिंग’ सारख्या छुप्या हल्ल्यांपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.

हे देखील वाचा –  Electric Cars: डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या