Bhimashankar Mandir : भारताला पर्यायाने महाराष्ट्राला संस्करिक परंपरा सण उत्सव तसेच धार्मिक पवित्र देवस्थाने हे सगळे महाराष्ट्राला लाभलेला वारसा आहे. त्यामुळे या संदर्भातील कोणतीही बातमी हि प्रत्येकासाठीच तितकीच महत्वाची असते. याच पार्शवभूमीवर महाराष्ट्रातील महत्वाच्या ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे भीमाशंकर मंदिर. परंतु; आता भीमाशंकर मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. हे ज्योतिर्लिंग हे भारताच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक येतात.
१ जानेवारीपासू भीमाशंकर मंदिर बंद राहणार आहे.१ जानेवारी २०२६ पासुन ते पुढेच ३ महिने भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भाविकांना नवीन वर्षाच्या सुरवातीला भीमाशंकर मंदिराला भेट देता येणार नाही आहे. नववर्ष सुरु होत असल्याने भीमाशंकरला विकास आराखड्यातुन नव्याने विकास कामे होत आहेत.
भिमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम सुरु होणार आहे. हे काम होत असताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय मंदिर प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे.
भिमाशंकरला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांना येण्यास मंदिर प्रशासनामार्फत बंदी घालण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात यासाठी प्रशासकिय पातळीवर पाहणी करुन नियोजनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतरच यासांबांधीत पुढील कामांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सध्या नाताळ आणि नववर्षानिमित्त सलग सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये अनेकजण तीर्थक्षेत्रांना देखील भेटी देतात. त्यामुळे जर तुम्ही भीमाशंकरला देवस्थानला भेट द्याचा नियोजन करत असाल तर नववर्षाच्या आधी भीमाशंकरला भेट द्या असे आव्हान देखील प्रशासनकडून करण्यात आले आहे.









