Home / महाराष्ट्र / Nitesh Rane Result 2025 : नितेश राणेंची एक्स पोस्ट बनतेय चर्चेचा विषय! पक्षाच्या, नेत्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प राहिलो….

Nitesh Rane Result 2025 : नितेश राणेंची एक्स पोस्ट बनतेय चर्चेचा विषय! पक्षाच्या, नेत्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प राहिलो….

Nitesh Rane Result 2025 : राज्यात मागच्या काही दिवसांपासून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम होती. आणि कालच राज्यातील २४६ नगरपरिषदा...

By: Team Navakal
Nitesh Rane Result 2025
Social + WhatsApp CTA

Nitesh Rane Result 2025 : राज्यात मागच्या काही दिवसांपासून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम होती. आणि कालच राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारली आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीत कोकणातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होते. आणि मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेने दणदणीत विजय प्राप्त केला. शिवसेना शिंदे गट १० जागांवर विजयी, तर भाजपाला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा ११, शिवसेना शिंदे गटाला ७, काँग्रेसला १ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा १ उमेदवार विजयी झाले.

कणकवलीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला ९ तर शहर विकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. विशेष: म्हणजे भाजपाचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. तर; कणकवली नगपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर १४५ मतांनी विजयी झाले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांच्यावर वरचढ ठरले असल्याचे चित्र सध्या आहे. (Nilesh Rane vs Nitesh Rane)

नगरपरिषदेच्या निकालानंतर आता नितेश राणेंच्या पोस्टने सगळ्याचे लक्ष वेधलं आहे. आणि आता त्यांची एक्स पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे कि गप्प होतो…पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी; पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे, अशी एक्स पोस्ट मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या या पोस्टमुळे राजकीय चर्चांना मात्र चांगलेच उधाण आले आहे.

हे देखील वाचा – Smriti Mandhana : स्मृती मानधना ठरली ‘क्वीन ऑफ टी20’! ‘हा’ टप्पा ओलांडणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या