40 Star Campaigner : राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकासांठी काँग्रेसकडून आज ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपका, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अमित देशमुख, अझरूद्दीन, राज बब्बर अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी १९ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्यात आली होती.
काँग्रेसच्या महापालिका निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, छत्रपती शाहू महाराज, सतेज उर्फ बंटी पाटील, मुकुल वासनिक, रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा समावेश आहे.
माजी क्रिकेटपटून मोहम्मद अझरूद्दीन, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसिम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिन पटेल यांचे देखील या यादीत नाव समोर आले आहे.
नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, विश्वजित कदम, भाई जगताप, अनिल अहेमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजीद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुझफ्फर हुसेन, एम. एम. शेख, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, हनुमंत पवार यांचीही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
हे देखील वाचा –Navneet Rana : महापालिका निवडणुकीत राजकीय गणितात धर्माचा खेळ? नवनीत राणाच ‘ते’ विधान चर्चेत









