Home / देश-विदेश / Akhlakh murder : गोमांसावरून अखलाखची हत्या !मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसला

Akhlakh murder : गोमांसावरून अखलाखची हत्या !मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसला

Akhlakh murder : गोमांसावरून अखलाखची हत्या !मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसलासंपूर्ण देशात बराच काळ चर्चेत राहिलेल्या उत्तर प्रदेशच्या बिसाहडा गावातील मोहम्मद...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Akhlakh murder : गोमांसावरून अखलाखची हत्या !मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसलासंपूर्ण देशात बराच काळ चर्चेत राहिलेल्या उत्तर प्रदेशच्या बिसाहडा गावातील मोहम्मद अखलाख सामूहिक हत्या (Akhlakh murder) गोमांसावरून अखलाखची हत्या !मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसला प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न न्यायालयाने आज हाणून पाडला. हा खटला रद्द करावा अशी याचिका उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने दाखल केलेली होती. न्यायालयाने ही याचिका साफ फेटाळून लावली. हा खटला चालूच राहील असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.


उत्तर प्रदेशच्या दादरीजवळील बिसाहडा गावातील एका शेतकर्‍याच्या गायीचे वासरू बेपत्ता झाले होते. ते वासरू गावातील मोहम्मद अखलाक आणि त्याच्या कुटुंबियांनी कापून तिचे मांस खाल्ले असा संशय ग्रामस्थांना होता. त्यावरून 28 सप्टेंबर 2015 रोजी रात्री 10 वाजता ग्रामस्थांचा जमाव अखलाखच्या घराबाहेर जमा झाला. अखलाखला घराबाहेर काढून ग्रामस्थांनी त्याला एवढे मारले की, त्यात त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर घरात उरलेले मांस तपासले तेव्हा ते गायीचे नसल्याचा खुलासा झाला.


अखलाखच्या हत्येच्या खटल्यात एकूण 19 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्याचा मुलगा विशाल राणा आणि शिवम नामक अन्य एका नातेवाईकाचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर अखलाखच्या हत्येचा आरोप आहे. या खटल्याची आज सुनावणी होती. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने खटला मागे घेण्यासाठी अर्ज सादर केला. मात्र खटला मागे घेण्यासाठी कोणतेही ठोस कारण सरकारने दिलेले नाही. सरकारच्या विनंतीला कोणताही कायदेशीर आधार नाही. अत्यंत फुटकळ असा हा अर्ज आहे असे परखड निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सरकारचा अर्ज फेटाळला. त्यामुळे योगी सरकारला चांगलीच चपराक बसली.


एकूणच अखलाखची जमावाने केलेली हत्या मुस्लिमद्वेष्ट्या राजकारणाचा परिपाक होता. उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदू विचाराच्या योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून राज्यात मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोमांस खाण्याच्या किंवा बाळगण्याच्या संशयावरून मुस्लिमांना मारहाण करण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या घटनेत भाजपाच्या स्थानिक नेत्याचा मुलगादेखील आरोपी असल्याने राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न म्हणून खटला मागे घेण्याचा अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने सरकारचा प्रयत्न हाणून पाडल्याने आता या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

तुर्कीची विमाने वापरण्यास इंडिगोला मार्चपर्यंतच मुदत

मुंबईत भगवे धगधगले; बांगलादेशातील अत्याचारावर मुंबईत तणावाचा स्फोट

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या