Thackeray Brother Alliance : महाराष्ट्रातील राजकारण म्हटलं की आवर्जून ज्यांचं नाव मुखाने घेतले जाते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या नेतृत्वासाठी हे दोन्ही मोठे नेते ओळखले जातात. मागच्या अनेक दशकांपासून यांच्या युतीकडे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे लक्ष लागून राहिले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे (Raj Thackeray) आणि राज ठाकरेंची (Uddhav Thackeray) युती कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर या युतीला मुहूर्त मिळालाच. अर्थात संजय राऊत सातत्याने माध्यमांसमोर येऊन याबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत होते. पण महाराष्ट्राला उत्सुकता होती ती यांच्या अधिकृत घोषणेची. पालिका निवडणुकांच्या तारखा पाहता ह्या घोषणेला इतका का उशीर होतो आहे असा प्रश्न उपस्थित होताना दिसत होता. पण काल संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करत आज युती होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन देखील केले.
याशिवाय काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सर्व नवनियुक्त नगरसेवक आणि नगराध्यक्षांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानेने घवघवीत यश मिळवल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

त्यानंतर आज दोन्ही ठाकरे बंधूनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन अभिवादन केले. मराठी भाषेचा विजयी मेळावा ते युतीची घोषणा इथं पर्यंतचा ठाकरे बंधुंचा प्रवास हा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा करणार कधी? याची प्रतीक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तर होतीच शिवाय अवघ्या महाराष्ट्रा देखील याची प्रतीक्षा होती. आणि त्यानंतर अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त जाहीर केला.
वरळी येथील हॉटेल ब्लू सी या ठिकाणी आज ठाकरे बंधू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत हि दमदार अशी युती जाहीर केली. त्याच ठिकाणी फेब्रुवारी २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा करण्यात आली होती. आणि आता ठीक ६ वर्षांनी या याच ठिकाणी ठाकरे बंधूनी आपल्या युतीची घोषणा केली आहे. मुंबईसह सात महापालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्घव ठाकरे एकत्रित निवडणुका लढणार आहेत. मात्र आता राजकीय परिस्थिती हि मोठ्या प्रमाणावर बदलली आहे, शिवसेना दुभंगली गेली असून सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे तसेच मनसेकडे महायुतीपेक्षा कमी ताकत असल्याचे चित्र आहे मात्र, आता मनपा निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान ठाकरे बंधू कस पेलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एका बाजूला भाजपा आहे ज्यांची राज्यात आणि केंद्रात मोठी सत्ता आहेत आणि एका बाजूला ज्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा अनेक राज्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त मानला जातो किंवा अर्थात त्या बरोबरीचा मानला जातो. आणि हीच महानगरपालिका गेल्या २५ हुन जास्त वर्षांपासून शिवसेनेकडे आहे अशी मुंबईची महानगरपालिका आणि त्यात आपला महापौर बसवण्यासाठी भाजपा यावेळी पूर्ण ताकतीने मैदानात जरी उतरली असली तरी ठाकरे बंधूंच्या या युतीचे चक्रव्यू ते भेदू शकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाकरे बंधूनी त्यांची युती अधिकृत रित्या जाहीर केली आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधूंचा हा धमाका निवडणुकीत इतर पक्षांना भारी पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकाच घरातील हे दोन सख्खे चुलत भाऊ बाळासाहेब ठाकरे नावाच्या धगधगत्या वादळाच्या कुशीत मोठे झाले. शिवसेना नावाच्या झंझावाती पक्षाच्या झेंड्याखाली दोघांचंही नेतृत्व फुलले आणि वाढले देखील. बाळासाहेब ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताचा फोटो पाहिला की महाराष्ट्राचं मन अगदी आजही हळव होत.
बाळासाहेब ठाकरेंनी पुत्र म्हणून उद्धव ठाकरे आणि पुतण्या म्हणून राज ठाकरेंमध्ये कधीही भेदभाव केलेला दिसला नाही. दोघांनाही बाळासाहेबांनी अगदी बोटाला धरून राजकीय मैदानात पाहिलं पाऊल टाकायला शिकवलं. सुरवातीच्या काळात राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा राजकीय मैदानात जास्त सक्रिय होते.
ठाकरे बंधूंच्या संघर्षाची कथा :
सुरवातीच्या काळात राज ठाकरेंनी व्यंगचित्रकार (Cartoonist) म्हणून देखील काम केले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या “मार्मिक” या साप्ताहिकासाठी देखील व्यंगचित्रे काढायचे. याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील सुरवातीच्या काळात त्यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. त्यांनी भारतात तसेच परदेशात सुंदर अशी फोटोग्राफी देखील केली आहे. आणि त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या काही काळ आधी राजकारणात सक्रिय झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर हळू हळू उद्धव ठाकरे देखील राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हायला लागले. कधीकाळी मांडीला मांडी लावणारे हे नेते अचानक एकमेकांविरोधात दंड थोपटू लागले. पण असं नेमकं घडलं तरी काय कि हे सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे पक्के राजकीय वैरी झाले. याचा सविस्त आढावा आपण क्रमवार पाहुयात.
१९८९ – राज ठाकरे राजकारणान सक्रीय झाले. तेव्हा उद्धव ठाकरे यांना छायाचित्रीकरणात अधिक रस होता.
१९९५ साली राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेची धुरा हातात घेतली. राज ठाकरेंच्या कामांचा देखील धडाका जोरात सुरू होता. आणि त्यानंतर बाळासाहेबांचे वारसदार म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जात होतं.
१९९७ साली मुंबई मनपाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचे दिसून आले. आणि इथेच पडली वादाची ठिणगी.
२००२ साली मुंबई मनपा निवडणुकीची जबाबदारी उद्धव यांच्याकडे सोपवण्यात आली. राज ठाकरेंसह त्यांच्यावर जवळच्या नेत्यांना डावलल्याचे आरोप सत्र सुरु झाले. त्यानंतर २००२ मध्येच उध्दव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा झाली . महाबळेश्वर येथे झालेल्या या कार्यकारिणी बैठकीत उध्दव ठाकरे यांचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला होता.
२००४ साली राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर पहिल्यांदा उघडपणे टीका केली.
त्यानंतर १८ डिसेंबर २००५ ला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडण्याची घोषणा केली. आणि त्यानंतर मात्र राजकीय वर्तुळात भूकंप आला.
९ मार्च २००६ रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, आणि त्यानंतर उद्धव आणि राज यांच्या संघर्षाला सीमा राहिली नाही.
२००९ साली राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १३ आमदार पहिल्याच निवडणुकीत जिंकून आले.
त्यानंतर २०१२ साली उद्धव ठाकरेंवर हृदय शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.
पण या सगळ्यादरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दरी निर्माण होत गेली. आणि ठाकरे घराण्यातला कडवा राजकीय संघर्ष जनतेच्या समोर येत गेला.
२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे दुर्दवी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी हे दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळाले. त्यानंतर हे दोन्ही नेते एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात देखील एकत्र दिसायचे. मात्र त्यांचं राजकीय वैर मात्र तसंच धगधत होत.
आणि त्यानंतर २०२२ साली उध्दव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. इतकं सगळं जरी असलं तरी दोन्ही भावांमधील दारी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती.
मात्र आता इतक्या वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
युतीआधी ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी कधी आणि कुठे झाल्या होत्या?
५ जुलै २०२५ : मराठी भाषेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर.
२७ जुलै २०२५ : मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली; राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी दाखल.
२७ ऑगस्ट २०२५ : तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन सहकुटुंब गणरायाचे दर्शन घेतले.
१० सप्टेंबर २०२५ : उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासोबत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल.
५ ऑक्टोबर २०२५ : खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला दोन्ही कुटुंबे एकत्र.
त्याच दिवशी राज ठाकरे कार्यक्रमानंतर मातोश्रीवर पोहोचले.
१२ ऑक्टोबर २०२५ : राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेले.
१७ ऑक्टोबर २०२५ : मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते; संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र.
२२ ऑक्टोबर २०२५ : राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेटीसाठी.
२३ ऑक्टोबर २०२५ : भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र.
१३ ऑक्टोबर २०२५ : राज्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत बैठक.
१४ ऑक्टोबर २०२५ : राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे आणि राज्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत एकत्रित बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद.
०१ नोव्हेंबर २०२५ : मतदारयाद्यांतील घोळ आणि निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा; या मोर्चाला “सत्याचा मोर्चा” असे नाव.
१० नोव्हेंबर २०२५ : अभिनेता सुबोध भावे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेते एकत्र.
२७ नोव्हेंबर २०२५ : उद्धव ठाकरे अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यासोबत बैठकीला उपस्थित.
१० नोव्हेंबर २०२५ : अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नाला संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित.
हे देखील वाचा – Rohit Pawar : ‘थोरातसाहेब, हे बघा फोटो’; रोहित पवारांचा काँग्रेसवर पुन्हा हल्ला, जामखेड पराभवावरून महाविकास आघाडीत जुंपली









